सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची कमान आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ईलॉन मस्क यांच्या हातात आहे. त्यांनी शुक्रवारी २८ ऑक्टोबरला ट्विटरला ४४ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा करार पूर्ण केला. यातच आता नवी माहिती समोर आली आहे. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी आता एक नवीन सोशल प्लॅटफॉर्म आणण्याच्या तयारीत आहेत. ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये ट्विटरचे सीईओ पद सोडले. सहा महिन्यांनंतर ते संचालक मंडळातूनही बाहेर पडले.
तुमचे आधार कार्ड बनावट तर नाही ना? जाणून घ्या...
या सगळ्यानंतर डोर्सी आता ब्लूस्की सोशल या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे आपले लक्ष वळवत आहे. ट्विटरवर दिलेल्या प्रतिसादात ते समोर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. मात्र, डोर्सी यांनी ट्विटरसोबत कोणतीही स्पर्धा नसल्याचे म्हटले आहे.
कंपनीने Twitter द्वारे सांगितले की, जगभरातील वेब ब्राउझरशिवाय तयार केले असले तरीही ते फार मजेदार आणि मनोरंजक नसते. आम्ही ब्लूस्की नावाचे सोशल अॅप्लिकेशन तयार करत आहोत, असं कंपनीने म्हटले आहे.
इलॉन मस्क यांनी ट्विटर घेतले आहे. त्यांनी या डीलनंतर सीईओ पराग अग्रवाल आणि मुख्य वित्त अधिकारी नेड सेगल यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांना काढून टाकले आहे. मस्क यांचे एक ट्विटही या डीलनंतर चर्चेत आहे.