तैवानमधील सर्वात मोठी आयफोन निर्माता कंपनी फॉक्सकॉन(Foxconn)ने भारतातील वेदांता(Vedanta)सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. जगावर आलेल्या चिप टंचाईदरम्यान, या दोन कंपन्या भारतात चिपचे उत्पादन करणार आहेत. फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे, जी अॅपलचीही मोठी पुरवठादार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, कंपनीने इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रात विस्तार केला आहे.
900 कोटींची गुंतवणूकफॉक्सकॉनने एका निवेदनात म्हटले की, त्यांनी वेदांत समूहासोबत भारतात चिप तयार करण्यासाठी करार केला आहे. कंपनीने भारतात इलेक्ट्रॉनिक्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फॉक्सकॉन या संयुक्त उपक्रमाची स्थापना करण्यासाठी $118.7 दशलक्ष किंवा सुमारे 900 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या भागीदारीअंतर्गत फॉक्सकॉनची 49 टक्के भागीदारी असेल.
जागतिक स्तरावर फॉक्सकॉनचे कामकंपनीने म्हटले की, दोन कंपन्यांमधील अशा प्रकारचा हा पहिलाच संयुक्त उपक्रम आहे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतात सेमीकंडक्टर उत्पादनासाठी इकोसिस्टम तयार करण्याचे स्वप्न साकार करेल. यापूर्वी फॉक्सकॉनने जागतिक स्तरावर चिप्स तयार करण्यासाठी याजिओसोबत भागीदारी केली आहे.
iPhone चे भारतात उत्पादनविशेष म्हणजे, Foxconn फक्त भारतात iPhone 12 चे उत्पादन करत आहे. फॉक्सकॉनचा प्लांट तामिळनाडूमध्ये आहे. भारतात iPhone 12 च्या प्रोडक्शनची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली. काही दिवसांपूर्वी, एका अहवालात असेही म्हटले की, Apple ने भारतात iPhone 13 चे चाचणी उत्पादन सुरू केले आहे, जे फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये देखील होत आहे. आयफोन 11 आणि आयफोन 12 चे भारतात फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये आधीच उत्पादन केले जात आहे.