शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

सावधान! मोबाईलवर आलेला 'तो' एक मेसेज ठरेल धोकादायक; रिकामं होईल खातं; 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 7:45 PM

Fraud alert do not click on links in message of festival gift : लोकांचा कल हा ऑनलाईन खरेदी करण्याकडे अधिक आहे. मात्र असं असताना हॅकर्स आणि ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार सक्रिय झालेत.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान लोकांचा कल हा ऑनलाईन खरेदी करण्याकडे अधिक आहे. मात्र असं असताना दुसरीकडे हॅकर्स आणि ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार लोकांचे आर्थिक नुकसान करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. सायबर गुन्हेगार दिवाळी गिफ्ट, गिफ्ट व्हाउचर, मोठ्या डिस्काउंटवर खरेदी किंवा लॉटरी असे मेसेज पाठवतात. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर त्यावर विचारपूर्वक क्लिक करा. कारण एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे होऊ शकते. मोठा आर्थिक फटका बसू शकतो. 

मोबाईलवर गिफ्ट व्हाऊचरची लिंक पाठवून तुम्हाला तुमच्या एटीएम-डेबिट कार्ड माहिती (ATM/Debit Card Details) विचारली जात असल्यास वेळीच सावध व्हा. तसेच पेमेंट दरम्यान जर कोणी तुम्हाला OTP विचारला तर समजा की तुम्ही हॅकर्सचे टार्गेट आहात. तसं पाहिलं तर कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था पेमेंट करताना ग्राहकांकडून ओटीपी मागत नाही. जर एखादी अनोळखी व्यक्ती किंवा लिंक नवीन एप डाउनलोड करण्यास सांगत असेल तर समजून घ्या की तुम्ही हॅकिंगचे शिकार होऊ शकता.

ऑनलाइन फसवणूक करणारे गुन्हेगार प्रथम लॉटरी सोडतीची लिंक किंवा वस्तूंवर मोठी सवलत असे मेसेज व्हॉट्सएप किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवतात. त्यात दिलेली माहिती वाचण्यासाठी बहुतेक लोक लिंकवर क्लिक करतात. तुम्ही लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या Google Pay किंवा PhonePe द्वारे काही पैसे कापले जातात. तुम्ही चुकून ओटीपी दिल्यास त्यांना तुमच्या बँक खात्याचा पूर्ण एक्सेस मिळतो.

'अशी' घ्या काळजी

- कमी पैसे खात्यातून काढले गेले म्हणून अकाऊंट फक्त ब्लॉक करून दुर्लक्ष करू नका. जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार नोंदवा.

- तुमच्या PhonePe, Google Pay किंवा इतर UPI मध्ये OTP केल्यानंतर पेमेंटची सेटिंग करा. कोणी OTP मागितला तर तो देऊ नका.

- जर एखाद्या अज्ञात व्यक्तीने तुमच्या खात्याची माहिती मागितली तर ती देऊ नका. कोणतीही बँक खाते किंवा एटीएम-डेबिट कार्ड तपशील विचारत नाही.

- जर तुम्हाला कोणत्याही लिंकमध्ये अनोळखी एप डाऊनलोड करून पेमेंट करण्यास सांगितले जात असेल तर तसं करू नका.

- कोणाच्या सांगण्यावरून Any Desk, Team Viewer किंवा इतर कोणतेही एप डाउनलोड करू नका. याच्या मदतीने हॅकर्सना तुमच्या सिस्टीम किंवा मोबाईलमध्ये प्रवेश मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी