शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

मोफत मिळवा 20GB हाय-स्पीड डेटा! Reliance Jio ची शानदार संधी!! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 7:14 PM

Free 20GB Data by Jio Check Best Opportunity : आज आम्‍ही तुम्‍हाला जिओच्‍या लेटेस्ट ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्‍हाला मोफत 20GB डेटा मिळेल. 

नवी दिल्ली : भारतात प्रामुख्याने तीन खाजगी दूरसंचार कंपन्या आहेत. त्यापैकी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडियापेक्षा (Vodafone Idea) खूपच नवीन आहे. काही वर्षांत, जिओ देशातील नंबर वन टेलिकॉम कंपनी बनली आहे आणि कंपनीच्या ग्राहकांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. आपल्या ग्राहकांना परवडणारे प्लॅन देण्याव्यतिरिक्त जिओ कंपनी आणखी अनेक शानदार ऑफर्स आणि बेनिफिट्स देते. आज आम्‍ही तुम्‍हाला जिओच्‍या लेटेस्ट ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्‍हाला मोफत 20GB डेटा मिळेल. 

तुम्हाला जिओकडून 20GB मोफत डेटासाठी कोणताही रिचार्ज प्लॅन खरेदी करावा लागणार नाही किंवा तो कोणत्याही अतिरिक्त ऑफरचा भाग नाही. जिओच्या या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर जिओचे अधिकृत अॅप माय जिओ अॅप वापरावे लागेल, तुम्हाला ही ऑफर याठिकाणी मिळेल. आता जाणून घेऊया रिलायन्स जिओ कोणती ऑफर देत आहे, जेणेकरुन तुम्ही 20GB डेटाचा मोफत आनंद घेऊ शकता. दरम्यान, जिओने एक लकी ड्रॉ आयोजित केला आहे, ज्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही 20GB इंटरनेट मोफत मिळवू शकता. तुम्ही 8 जुलैपर्यंत या लकी ड्रॉमध्ये सहभागी होऊ शकता. लकी ड्रॉ मधून पाच जणांना 20GB डेटा जिंकण्याची संधी मिळेल.

या ऑफरसाठी तुम्हाला आधी तुमच्या स्मार्टफोनवर माय जिओ अॅप (My Jio App) उघडावे लागेल, जेव्हा तुम्ही होम स्क्रीनवर थोडेसे स्क्रोल कराल तेव्हा तुम्हाला 'जिओ प्ले अँड विन (Jio Play and Win)चा एक कॉलम दिसेल. ज्यामध्ये पहिला ऑप्शन या 20GB डेटासह लकी ड्रॉचा असेल. या ऑप्शनवर क्लिक करताच तुम्हाला 'पार्टिसिपेट नाऊ'चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला एका साध्या प्रश्नाचे अचूक उत्तर द्यावे लागेल, त्यानंतर या लकी ड्रॉसाठी तुमची नोंदणी केली जाईल. या लकी ड्रॉचा निकाल 8 जुलै रोजी जाहीर होणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान