नवी दिल्ली : आजच्या काळात सोशल मीडिया (Social Media) माहितीचे एक मोठे माध्यम बनले आहे. परंतु या माध्यमाची विश्वासार्हता सतत कमी होत आहे, यामागील कारण चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती आहे. असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार 10 कोटी युजर्संना मोफत इंटरनेट (Free internet plan) देणार आहे. (free internet plan by government for 100 million users know reality pib fact check)
या दाव्याची सत्यता?यासंदर्भात सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) टीमने हे स्पष्ट केले आहे की, हा फेक मेसेज (Fake Message) म्हणजेच सरकारची अशी कोणतीही योजना नाही की जी मोफत इंटरनेट (Free Internet Scheme) देण्यात येईल.
अशा बनावट वेबसाइटपासून सावध रहापीआयबीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, "व्हॉट्सअॅप (WhatsApp) मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार 10 कोटी युजर्संना तीन महिन्यांकरिता विनामूल्य इंटरनेट सुविधा पुरवित आहे. PIB Fact Check: हा दावा आणि लिंक बनावट आहे. अशी कोणतीही घोषणा भारत सरकारने केलेली नाही. अशा बनावट वेबसाइटपासून सावध राहा."
तुमच्याजवळ असा मेसेज आला तर करू शकता फॅक्ट चेकजर आपल्याला कोणताही अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्अॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता. यासंबंधी माहिती पीआयबीची वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.