Free LIVE IPL: 26 मार्चपासून IPL 2022ची सुरुवात झाली आहे. हे आयपीएल सामने स्टार स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहेत. पण, स्टार स्पोर्ट्स मोफत नसून, त्यासाठी किंमत मोजावी लागत आहे. स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी वाहिनीला सध्या खूप मागणी आली आहे. दरम्यान, भारतातील आघाडीची डायरेक्ट-टू-होम (DTH) सेवा देणारी कंपनी D2h आपल्या ग्राहकांना एका महिन्यासाठी स्टार स्पोर्ट्स 1 हिंदीचे सबस्क्रिप्शन देत आहे.
तुमच्याकडे एसडी बॉक्स असेल, तर त्यावर तुम्हाला स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी आणि एचडी बॉक्स असेल, तर त्यावर एचडीचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. पण, कंपनीतर्फे मोफत चॅनल सर्वांना उपलब्ध करून दिले जाणार नाही. ज्या ग्राहकांनी नवीन सेट-टॉप बॉक्स (STB) खरेदी केला आहे, त्यांनाच हे चॅनल एका महिन्यासाठी मोफत दिसेल. ग्राहकांनी एसटीबी अॅक्टीव्ह केल्यानंतर कंपनीकडून मोफत चॅनेल ऑफर केले जाईल. ग्राहकांना एकूण 30 दिवसांसाठी स्पोर्ट्स 1 हिंदी / स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी HD विनामूल्य दिसेल.
d2h बॉक्स कसा खरेदी करायचाd2h बॉक्स खरेदी करण्याचे अनेक पर्याय आहेत. सर्वप्रथम कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन नवीन कनेक्शनसाठी नोंदणी करू शकता. यात तुम्ही कंपनीच्या ग्राहक सेवा टीमशी संपर्क साधू शकता. याशिवायतुम्ही कोणत्याही रिटेल स्टोअरला भेट देऊन D2h कनेक्शन मिळवू शकता. SD d2h सेट-टॉप बॉक्स (STB) फक्त रु.699 पासून सुरू होतो. हा STB खरेदी केल्यावर ग्राहकांना 2,000 रुपयांचे कूपन मिळेल. कंपनी नवीन ग्राहकांना डोअर-स्टेप सेवा प्रदान करेल, याचा अर्थ नवीन D2h कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडण्याची गरज नाही.