Xiaomi India आता भारतात आपल्या स्मार्टफोन युजर्सना मोफत YouTube Premium Subscription देत आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे शाओमी स्मार्टफोन असेल तर तुम्ही तीन महिन्यांपर्यंत मोफत युट्युब प्रीमियम मेंबरशिप मिळवू शकता. या ऑफरचे काही नियम आणि अटी आहेत, तसेच या ऑफरसाठी पात्र असलेल्या स्मार्टफोन्सची यादी देखील आहे. याची माहिती पुढे देण्यात आली आहे.
YouTube प्रीमियम सब्सक्रिप्शन मोफत कसं मिळवावं
YouTube प्रीमियम सब्सक्रिप्शन निःशुल्क मिळवण्यासाठी तुमच्या Xiaomi/Redmi डिवाइसवर YouTube चं लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करणं आवश्यक आहे. ही ऑफर 6 जून 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत उपलब्ध असेल. ही ऑफर मिळवण्यासाठी Xiaomi स्मार्टफोन 1 फेब्रुवारी 2022 या दिवशी किंवा त्यानंतर अॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे.
तुमचं शाओमी किंवा रेडमी डिवाइस पात्र जरी असेल परंतु तुम्ही तुमच्या गुगल अकाऊंटवरून मोफत प्रीमियम सब्सस्क्रिप्शन घेतलं असेल तर तुम्हाला शाओमीची ऑफर रिडिम करता येणार नाही. ही ऑफर क्लेम करण्यासाठी YouTube प्रीमियम साइन-अप करावे लागेल आणि त्यासाठी एखादं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असणं आवश्यक आहे. YouTube प्रीमियम अॅक्टिव्ह झाल्यानंतर युजर ते मोफत रद्द करण्यासाठी शेवटच्या दिवशीच्या आधी डिसेबल करू शकतात.
या डिव्हाइसेसना मिळेल YouTube प्रीमियम मोफत
हाय एन्ड आणि फ्लॅगशिप डिव्हाइसेसना तीन महिन्याचं मोफत युट्युब प्रीमियम सब्सस्क्रिप्शन मिळेल. ज्यात Xiaomi 12 Pro, Xiaomi 11i, Xiaomi 11i Hypercharge आणि Xiaomi 11T Pro असणाऱ्या पात्र युजर्सचा समावेश आहे. तर मिडरेंज शाओमी युजर्सना दोन महिने मोफत युट्युब प्रीमियम सेवा वापरता येईल. ज्यात Xiaomi Pad 5, Redmi Note 11 Pro+, Redmi Note 11 Pro, Redmi Note 11, Redmi Note 11T आणि Redmi Note 11S या डिव्हाइसेसचा समावेश आहे.