शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 4:50 PM

काही जणांकडे फ्रिज हा भिंतीला चिटकून ठेवला जातो. पण हे असं करणं धोक्याचं आहे. फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी, नेमकं किती अंतर असावं हे जाणून घेऊया...

उन्हाळ्यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणाला अतिउष्णतेचा फटका बसतोच. मग तो स्मार्टफोन, एसी, टीव्ही किंवा फ्रिज असो. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला स्पर्श केल्यास उष्णतेच्या लाटेचा किती परिणाम झाला आहे हे दिसून येतं. उन्हाळ्यात बराच वेळ फ्रिज सुरू असल्याने तो सर्व बाजूंनी गरम होतो. त्यामुळेच काही वेळानंतर फ्रिज बंद ठेवावा, असे सांगितले जाते. 

जर आपण तो २४ तास सुरू ठेवला तर त्याचा कंप्रेसर खूप वेगाने गरम होतो, ज्यामुळे कूलिंगवर खूप परिणाम होतो. कॉम्प्रेसर सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. काही जणांकडे फ्रिज हा भिंतीला चिटकून ठेवला जातो. पण हे असं करणं धोक्याचं आहे. फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी, नेमकं किती अंतर असावं हे जाणून घेऊया...

फ्रिजच्या मागे पुरेशी जागा ठेवा

फ्रीज जुना असेल तर विजेचा वापर नक्कीच जास्त होतो. जुनं मॉडेल लवकर गरम होतं. अशा परिस्थितीत फ्रिजच्या मागे पुरेशी मोकळी जागा असणं आवश्यक आहे. फ्रीज भिंतीजवळ ठेवल्यास त्याच्या कंप्रेसरमध्ये हवा जाणार नाही. शिवाय, तो वेगाने गरम होऊ शकतो. अशा स्थितीत मोटारमध्ये आग लागण्याचा देखील मोठा धोका असतो.

जर तुमचा फ्रीज जुन्या मॉडेलचा असेल तर त्यात अमोनिया गॅस वापरला गेला आहे. हा गॅस अतिशय धोकादायक आहे आणि तो लीक होण्याचा धोकाही जास्त आहे.

फ्रिज भिंतीपासून नेमक्या किती अंतरावर ठेवावा?

फ्रिज भिंतीजवळ ठेवण्याची चूक कधीच करू नये. फ्रीज ठेवत असाल तर किमान ४ ते ६ इंच जागा या दोघांमध्ये असावी. जर तुमच्या कंप्रेसरमधून खूप मोठा आवाज येत असेल किंवा अजिबातच आवाज येत नसेल तर त्याकडे नक्कीच लक्ष देण्याची गरज आहे.