शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

शरीरातील स्टॅमिना सांगणार Smartwatch; एकदा चार्ज करा आणि 16 दिवस वापरा, पाण्याखाली देखील चालणार  

By सिद्धेश जाधव | Published: January 20, 2022 1:22 PM

Garmin Epix Gen 2 Smartwatch: Garmin Epix Gen 2 मध्ये SpO2 सेन्सर, Heart Rate मॉनिटर आणि Stamina ट्रॅकर असे भन्नाट हेल्थ स्पेक्स देण्यात आले आहेत.

Garmin Epix Gen 2 स्मार्टवॉच काही भन्नाट फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे. यात बेसिक हेल्थ फीचर्स तर आहेतच सोबत स्टॅमिना ट्रॅकर, रेस्पिरेशन (श्वसन) आणि स्लिप ट्रॅकिंग असे फिचर देखील मिळतात. हा स्मार्टवॉच 10ATM वॉटर प्रूफ रेटिंगसह सादर करण्यात आला आहे. त्यामुळे स्वीमर्स या वॉचचा वापर पोहताना देखील करू शकतात.  

Garmin Epix Gen 2 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स  

गार्मिन एपिक्स जेन 2 स्मार्टवॉचमध्ये 1.3-इंचाचा वर्तुळाकार टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 416x416 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. जो ऑलवेज-ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो यात एंट्री लेव्हल मॉडेलमध्ये गोरिल्ला ग्लास डीएक्स प्रोटेक्शन तर बाकी दोन मॉडेल्स सॅफायर क्रिस्टलच्या सुरक्षेसह सादर करण्यात आले आहेत.  

कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस आणि एएनटी+ असे ऑप्शन मिळतात. यात वॉच मध्ये 10ATM वॉटर रेजिस्टन्स सर्टिफिकेशन देण्यात आलं आहे. यात हार्ट रेट, रेस्पिरेशन, पल्स, ब्लड ऑक्सीजन सॅचुरेशन, स्लिप आणि स्ट्रेस ट्रॅकिंग असे हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स मिळतात. शरीराचा स्टॅमिना सांगण्यासाठी यात बॉडी-बॅटरी फिचर मिळतं. तसेच अनेक स्पोर्ट्स देखील ट्रॅक करता येतात.  

यात बॅरोमेट्रिक अल्टीमीटर, कंपास, जायरोस्कोप, अ‍ॅक्सेलेरोमीटर, थर्मामीटर आणि एंबियंट लाईट सेन्सर असे सेन्सर देण्यात आले आहेत. गार्मिन एपिक्स जेन 2 स्मार्टवॉच मोडमध्ये 16 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो.  

Garmin Epix Gen 2 ची किंमत  

Garmin Epix Gen 2 स्मार्टवॉचच्या ब्लॅक टायटेनियम सॅफायर स्टील आणि व्हाईट टायटेनियम सॅफायर ऑप्शनमची किंमत 999.99 डॉलर (सुमारे 74,500 रुपये) आहे. तर एंट्री लेव्हल स्लेट स्टील मॉडेलची किंमत 899.99 डॉलर (सुमारे 67,000 रुपये) आहे. 

हे देखील वाचा:

तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट

OPPO च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! 12GB RAM, 65W Charging सह शक्तिशाली 5G Phone येतोय भेटीला

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य