सध्याच्या आपल्या आयुष्यातील गॅजेट्सची संख्या वाढली आहे. लॅपटॉप, स्मार्टफोन, वायरलेस इयरफोन्स, स्मार्टवॉच इत्यादींचा वापर वाढला आहे. त्यामुळे त्यांना वेळोवेळी चार्ज करावं लागतं, त्यांचे चार्जर सोबत बाळगावे लागतात. परंतु चार्जिंगची गरज नसलेला डिवाइस आला तर? असाच एक स्मार्टवॉच बाजारात आलं आहे जे सूर्यप्रकाशावर चार्ज होतं.
Garmin Instinct 2 वॉच सौर ऊर्जेचा वापर करून बॅटरी चार्ज करतं. कंपनीनं हे स्मार्टवॉच अॅडव्हेंचर ट्रॅव्हलर्सचा विचार करून बनवलं आहे, जे सतत फिरत असतात. यातील सोलर टेक्नॉलॉजी या स्मार्टवॉचला अनलिमिटेड बॅटरी लाईफ मिळवून देते. त्यामुळे तुम्हाला या स्मार्टवॉचचा चार्जर सोबत बाळगण्याची गरज नाही. कंपनीनं याआधी देखील सोलर पावर्ड स्मार्टवॉच सादर केलं आहे परंतु Garmin Instinct 2 मध्ये सुधारित टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
Garmin Instinct 2 स्मार्टवॉचचे स्पेक्स आणि फीचर्स
Instinct 2 सीरीजमध्ये 45 मिमी आणि 40 मिमी डायल असलेले दोन मॉडेल सादर करण्यात आले आहेत. या वॉचमध्ये एक हाय-रिजोल्यूशन आणि इजी टू रीड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात डिस्प्लेसाठी स्क्रॅच रेजिस्टन्स ग्लासचा वापर करण्यात आला आहे. यात हायड्रेशन ट्रॅकिंग, मेनूस्ट्रल ट्रॅकिंग आणि प्रेग्नन्सी ट्रॅकिंग फिचर देण्यात आलं आहे. तसेच बॉडी बॅटरी, स्ट्रेस मॉनिटर आणि हार्ट रेट मॉनिटरिंग फिचर देखील मिळतात. हे थर्मल आणि शॉक प्रूफ आहे आणि 100 मीटर पर्यंत वॉटर-रेटेड आहे. इंस्टिंक्ट 2 सोलर मॉडेलमध्ये अनलिमिटेड बॅटरी लाईफ मिळते.
Garmin Instinct 2 स्मार्टवॉचची किंमत
गार्मिन इंस्टिंक्ट 2 स्मार्टवॉच सध्या यूएस आणि युरोपियन बाजारात लाँच करण्यात आलं आहे. याचे दोन व्हेरिएंट कंपनीनं सादर केले आहेत. बेस व्हेरिएंट 349 डॉलर्स (जवळपास 26,313 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर Instinct 2S Solar मॉडेलसाठी 449 डॉलर्स (जवळपास 33,853 रुपये) द्यावे लागतील.
हे देखील वाचा: