जूनच्या अखेरीस जियोने आपल्या आगामी 4G स्मार्टफोन JioPhone Next ची घोषणा केली होती. कंपनीने सांगितले होते कि हा जगातील सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोन असेल आणि हा फोन 10 सप्टेंबर रोजी भारतात खरेदीसाठी उपलब्ध होईल. परंतु या कंपनीचा अजून एक स्वस्त 4G फोन आधीच बाजारात उपलब्ध आहे, तो म्हणजे JioPhone. हा एक 4G फिचर फोन आहे, जो WhatsApp, Facebook आणि इतर काही अॅप्सना सपोर्ट करतो. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अश्या ऑफर बद्दल सांगणार आहोत जिच्या मदतीने तुम्ही हा फोन मोफत मिळवू शकता. तुम्हाला फक्त दोन रिचार्ज प्लॅनमधून एकाची निवड करायची आहे आणि त्यावर तुम्हाला Jio Phone मोफत मिळेल.
Jio Phone Offer
Jio Phone 2021 ऑफरमध्ये कंपनीने हा फोन मोफत मिळवण्यासाठी दोन प्लॅन सादर केले आहेत. ही ऑफर खूप जुनी आहे परंतु अजूनही हीच फायदा घेता येईल. कंपनीचे दोन प्लॅन पुढील प्रमाणे आहेत:
Jio चा 1999 रुपयांचा प्लॅन
जियोने 1,999 रुपयांचा प्लॅन 2 वर्षांच्या वैधतेसह सादर केला आहे. या प्लॅनमध्ये 48 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये जियो अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळते. परंतु या प्लॅनचे मुख्य आकर्षण या प्लॅनसोबत मिळणार 4जी जियो फोन आहे.
Jio चा 1499 रुपयांचा प्लॅन
जियोच्या 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 वर्षांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 24 जीबी डेटा मिळतो. सोबत जियो अॅप्स सब्सक्रिप्शन आणि जियो फोन मोफत मिळतो.
Jio Phone चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
जियो फोन हा एक 4G फीचर फोन आहे. यात 2.4-इंचाचा क्यूडब्ल्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. तासेच यात 1.2 गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 ड्युअल कोर प्रोसेसर, 512 एमबी रॅम आणि 4 जीबी स्टोरेज मिळते. या फिचर फोनमध्ये 2-MP रियर कॅमेरा आणि एक वीजीए फ्रंट कॅमेरा आहे. जियो फोनमध्ये 2000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 4जी वीओएलटीई सह हा फोन ब्लूटूथ, वाय-फाय, एनएफसी, एफएम रेडियो, जीपीएस आणि यूएसबी 2.0 ला सपोर्ट करतो.