गाझियाबादचे धर्मांतराचे प्रकरण सध्या गाजत आहे. Fornite आणि Valorant सारख्या काही लोकप्रिय गेमद्वारे युजर्सना आपला धर्म बदलण्यास भाग पाडले गेले. या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी शाहनवाज मकसूद खान याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गेमिंग अॅप्समुळे पालक आणि इतर लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच, गेमिंग अॅप्सबाबत सरकार लवकरच मोठे पाऊल उचलणार आहे.
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतराच्या घटनेवर प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना राजीव चंद्रशेखर म्हणाले की, आम्ही पहिल्यांदा ऑनलाइन गेमिंगच्या फ्रेमवर्क सल्लामसलतीनंतर अधिसूचित केले आहे, ज्यामध्ये भारतात तीन प्रकारच्या गेम्सना परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, राजीव चंद्रशेखर यांच्या म्हणण्यानुसार, या तीनपैकी कोणत्याही एका प्रकारात कोणताही गेम आला तर भारतात त्यावर बंदी घातली जाईल.
अशा प्रकारच्या गेम्सना परवानगी दिली जाणार नाही 1. बेटिंग गेम2. युजर्सला हानी पोहोचवणारे गेम3. व्यसनाधीन (अॅडिक्टिव्ह) गेम
काय आहे गाझियाबाद ऑनलाइन गेमिंग प्रकरण?शाहनवाज उर्फ बढ्दो हा गेमिंग अॅप्सवर चॅटिंगद्वारे तरुणांना धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त करत होता. गेम जिंकण्याचे टेक्निक सांगण्याच्या नावाखाली तो प्लेअर्सशी इस्लामविषयी बोलत होता. तसेच, गेम जिंकण्यासाठी कुराणचा श्लोक वाचायला सांगायचा. आरोपीच्या जाळ्यात अडकून महाराष्ट्रातील मुंब्रा येथील 400 हून अधिक लोकांनी धर्म बदलला असल्याचे म्हटले जात आहे. सध्या शाहनवाजला पोलिसांनी अटक केली आहे.