जिओनी कंपनीने आपल्या ड्युअल रिअर कॅमेर्यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सन सज्ज असणार्या जिओनी ए १ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल सहा हजार रूपयांची घट केली आहे.
गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात जिओनी ए१ प्लस हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत २६,९९९ रूपये किंमतीत सादर करण्यात आला होता. डिसेंबरच्या अखेरीस याचे मूल्य तीन हजार रूपयांनी कमी केल्यामुळे २३,९९९ रूपये इतके होते. तर यात आता तब्बल सहा हजारांची कपात करण्यात आली असून हा स्मार्टफोन ग्राहकांना १७,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. अतिशय दर्जेदार फोटोग्राफी आणि दीर्घ काळापर्यंत चालणारी बॅटरी ही जिओनी ए १ प्लस या मॉडेलची वैशिष्ट्ये आहेत. यात मागच्या बाजूला एफ/२.० अपार्चरसह १३ मेगापिक्सल्स आणि ५ मेगापिक्सल्स असे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात २० मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यासाठी कस्टमाईज्ड सेल्फी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. याच्या जोडीला ब्युटी इन्हान्समेंट तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहर्याला उजळ करत सेल्फी घेता येतात. यात बोके इफेक्ट प्रदान करण्याची सुविधादेखील आहे. अर्थात चेहरा केंद्रस्थानी ठेवून भोवताल ब्लर केल्यामुळे घेतलेली प्रतिमा (सेल्फी) ही अतिशय कलात्मक दिसते.
जिओनी ए १ प्लस या मॉडेलमध्ये ४५५० मिलीअँपिअर इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात अल्ट्रा फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने अवघ्या पाच मिनिटात दोन तासांचा बॅकअप इतक्या कालावधीचे चार्जींग होते. यात सहा इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १२८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा २.५ डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ हे संरक्षक आवरण असेल. ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी२५ या वेगवान प्रोसेसरने सज्ज असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यावर जिओनी कंपनीचा अमिगो ४.० हा युजर इंटरफेस असेल. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविणे शक्य असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ आदी कनेक्टीव्हिटीचे पर्याय आहेत. यासोबत यात जलद गतीने खुलणारे फिंगरप्रिंट सेन्सर आहे. ज्यामुळे फोन फक्त ०.२ सेकंदात अनलॉक होतो.