GIZFIT 910 PRO स्मार्टवॉचनं भारतात एंट्री घेतली आहे. SpO2 सेन्सर, ब्लड प्रेशर मॉनिटर, हार्ट रेट सेन्सर आणि हायड्रेशन मॉनिटर असलेल्या या स्मार्टवॉचची किंमत देखील बजेटमध्ये ठेवण्यात आली आहे. यात कंपनीनं एक हाय क्वॉलिटी मेटल डायल दिला आहे. तसेच यातील ब्लूटूथ कॉलिंग फिचर तुम्हाला स्मार्टवॉचवरूनच कॉल करण्यास मदत करतं.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
GIZFIT 910 PRO स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचाचा आयाताकार डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 500 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यात रक्तातील ऑक्सिजनची लेव्हल सांगणार SpO2 सेन्सर देण्यात आलं आहे. तसेच यात ब्लड प्रेशर मॉनिटर आणि हार्ट रेट सेन्सर देण्यात आला आहे. यात अनेक स्पॉर्ट्स मोड देण्यात आले आहेत. GIZFIT 910 PRO मधील हायड्रेशन अलर्ट वेळोवेळी पाणी पिण्याची आठवण करून देतो.
या स्मार्टवॉचमध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेस आहेत, जे कस्टमायजेशनसाठी मदत करतात. तसेच यात बिल्ट-इन व्हॉइस असिस्टंट फिचर देण्यात आलं आहे. ब्लूटूथ कॉलिंगसाठी या घड्याळात बिल्ट-इन मायक्रोफोन आणि स्पीकर देण्यात आला आहे. GIZFIT 910 PRO सिंगल चार्जवर 7 दिवस वापरत येतो. या स्मार्ट वियरेबलमध्ये IP67 वॉटर-रेजिस्टन्स देण्यात आलं आहे.
किंमत
GIZFIT 910 PRO स्मार्टवॉचची मूळ किंमत 5,999 रुपये आहे, परंतु लाँच ऑफर अंतर्गत याची विक्री फक्त 2,499 रुपयांमध्ये केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. हे स्मार्टवॉच रिटेल स्टोर्समधून विकत घेता येईल.