नवी दिल्ली -केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे एक महत्वाचे काम सोपवले आहे. ही एक आधार कार्डशी संबंधित अत्यंत महत्वाची प्रोसेस आहे. याअंतर्गत महत्वाचे सरकारी डॉक्युमेंट्स आधारच्या माध्यमाने ऑटो अपडेट होतील. मात्र, ही सिस्टिम प्रत्यक्षात येण्यासाठी काही वेळ लागू शकतो. खरे तर, एक अशी सिस्टिम तयार करण्याची सरकारची इच्छा आहे, जिच्या मदतीमुळे युजर्सना आवश्यक डॉक्युमेंट्सवरील घराचा पत्ता बदलण्यासाठी कुठल्याही संबंधित डिपार्टमेंट अथवा मंत्रायालत जाण्याची गरज पडणार नाही. युजरने आपल्या आधारवर बदल केला, की तो आपोआपच संबंधित डॉक्युमेंट्सवरही होऊन जाईल.
आधारच्या माध्यमाने ऑटो-अपडेट कसे काम करते? -माध्यमांतील वृत्तांनुसार, या सिस्टिमचा लाभ प्रमुख्याने जे युजर्स डिजिलॉकरवर डॉक्युमेंट्स स्टोअर करतात अशांना होईल. डिजीलॉकरवर लायसन्स, पॅन कार्ड आणि इतर काही दस्तऐवज डिजिटल स्वरुपात सेव्ह करता येतात. अशात आधार कार्डमध्ये करण्यात आलेला बदल डिजिलॉकरमध्ये असलेल्या इतर डॉक्युमेंट्सवरही होईल. महत्वाचे म्हणजे, या फीचरचा वापर करायचा की नाही, हे पूर्णपणे युजरवर अवलंबून असेल.
सध्या, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे (MeitY) परिवहन, ग्राम विकास आणि पंचायत राज सारख्या मंत्रालयांसोबत काम करत आहे. नंतर, यात इतरही काही विभागांचा समावेश केला जाऊ शकतो. यामुळे यूजर्सना पासपोर्ट आदीही ऑटो अपडेट करू शकतील. यासाठी, सरकार सॉफ्टवेयर एपीआय (अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) विकसित करेल.
ऑटो-अपडेट सिस्टिमचा फायदा:माध्यमांतील वृत्तांनुसार, आधारच्या माध्यमाने डिजीलॉकर डॉक्युमेंट्स अपडेट करण्यासाठी एक ऑटो-अपडेट सिस्टिम तयार केली जाईल. यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. याच बरोबर फेक डॉक्युमेंट्सची शक्यताही कमी होईल. महत्वाचे म्हणजे, नोकरीच्या निमित्ताने ज्या लोकांना सातत्याने आपले लोकेशन बदलावे लागते अशा लोकांसाठीही हे अत्यंत महत्वाचे ठरेल.