आज घडीला रिलायन्सजिओकडे सर्वाधिक युजरबेस आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, जिओचे परवडणारे प्लॅन्स. असाच एक प्लॅन आहे 152 रुपयांचा. या प्लॅनमध्ये संपूर्ण महिन्यासाठी डेटा आणि कॉलिंग सेवा मिळते. याच बरोबर इतर काही मोफत सेवाही दिल्या जातात. जर आपल्याला फारशा डेटाची आवश्यकता नसेल तर आपण Jio चा 152 रुपयांचा प्लॅन वापरू शकता. हा प्लॅन आपल्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.
जिओचा 152 रुपयांचा प्लॅन - या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची वैधता आणि रोज 500MB म्हणजेच 0.5GB डेटाही मिळतो. 28 दिवसांचा विचार करता, आपल्याला एकूण 14 GB डेटा मिळतो. महत्वाचे म्हणजे, दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल. याच बरोबर या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि रोज ३०० एसएमएसची सुविधाही दिली जाते. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओक्लाऊडचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते. यावेळी आयपीएल केवळ जिओ सिनेमावरच प्रसारित होत आहे.
जिओचे इतर काही प्लॅन -जिओकडून विविध प्रकारचे प्लॅन ऑफर केले जातात. जर Jio च्या प्लॅनसंदर्भात बोलायचे झाल्यास, Jio कडून 75 रुपये, 91 रुपये, 125 रुपये, 186 रुपये, 223 रुपये आणि 895 रुपयांचे स्वस्तातले प्लॅन्स ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री डेटाची सुविधा दिली जाते.