नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. Google भारतात 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी गुगल भारतामध्ये डिजिटलायझेशनसाठी 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेशनसाठी ही रक्कम असणार आहे.
सुंदर पिचाई यांनी "आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत 10 बिलीयन डॉलर्सच्या (75 हजार कोटी) गुंतवणूकीची घोषणा केली आहे. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार" असं ट्विट केलं आहे. तसेच एएनआय या वृत्तसंस्थेनेही याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुंदर पिचई यांच्यात सोमवारी सकाळीच बैठक झाली. भारतीय शेती आणि उद्योगांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसा फायदा करुन देता येईल यावर चर्चा झाली. तसेच डेटा सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यावरही सुंदर पिचाई यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती मोदी यांनी दिली होती. यानंतर आता सुंदर पिचाई यांनी गुगलकडून करण्यात येणारी गुंतवणूक ऑपरेशन्स व डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधा यांच्याशी संबंधित असणार असल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Rajasthan Political Crisis : "राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"
CBSE Results 2020 : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर
CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी
CoronaVirus News : "कोरोनाच्या लढाईत सरकार फेल पण क्रेडिट चोरीत केजरीवाल अव्वल"
...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; मुसळधार पावसामुळे कोसळली इमारत, थरकाप उडवणारा Video
Rajasthan Political Crisis : "तबेल्यातून घोडे निघून गेल्यावर आपण जागे होणार आहोत का?"
"पंतप्रधानांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वच जण गुन्हेगारांना आश्रय देतात"