स्मार्टफोन हा आजकाल सर्वांच्याच जिवनातील अविभाज्य भाग झाला आहे. दरम्यान, अनेकांकडे अँड्रॉईड फोनही असेल. गुगल (Google) लवकरचं नवं ऑपरेटिंग सिस्टम Android 12 लाँच करणार आहे. यामध्ये अनेक नवे फीचर्स असतील. सध्या या नव्या फीचर्सची चाचणी सुरू असून गुगल असिस्टंटदेखील (Google Assistant) अपडेट केलं जात आहे. नव्या फीचरद्वारे तुम्ही केवळ व्हॉईस कमांडद्वारे तुमचा स्मार्टफोन स्विच ऑफ करू शकता. 9to5Google नं हे फीचर स्पॉट केलं आहे. रिपोर्टनुसार गुगल असिस्टंट अॅक्टिव्हेट करण्याची पद्धतही बदलली जात आहे. सध्याच्या स्थितीत Hey Google किंवा Ok Google बोलावं लागतं. तसंच यानंतर होम बटन लाँग प्रेस करावं लागतं. या नव्या अपडेटसोबत स्मार्टफोनचं पॉवर बटनही लाँग प्रेस केल्यानंतर गुगल असिस्टंट अॅक्टिव्हेट होईल.दरम्यान, आता पॉवर बटन लाँग प्रेस केल्यानंतर जर गुगल असिस्टंट सुरु झालं तर फोन स्विच ऑफ कसा केला जाईल, असा प्रश्न उपस्थित होतो. 9to5Google नं दिलेल्या माहिनुसार युझरकडे फोन स्विच ऑफ करण्यासाठी दोन पर्याय असतील. पहिला म्हणजे पॉवर बटन आणि व्हॉल्युम अप बदन एकत्र प्रेस करावं. त्यामुळे तुमच्या स्क्रीनवर स्विच ऑफ किंवा रिस्टार्टचा ऑप्शन येईल आणि दुसरा पर्याय म्हणजे गुगल असिस्टंटला पॉवर ऑफ अशी व्हॉईस कमांड देता येईल. परंतु यानंतर फोन थेट बंद होईल किंवा पॉवर मेन्यू उघडेल याबद्दल मात्र माहिती समोर आली नाही.
केवळ Voice Command देऊन स्विच ऑफ करता येणार फोन; पाहा कोणतं आहे हे फीचर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 6:24 PM
Android युझर्सासाठी येणार नवं फीचर. Google लवकरच Android 12 लाँच करण्याच्या तयारीत.
ठळक मुद्देAndroid युझर्सासाठी येणार नवं फीचर. Google लवकरच Android 12 लाँच करण्याच्या तयारीत.