Google ने Play Store वरून 8 धोकादायक क्रिप्टोकरन्सी अॅप्स काढून टाकले आहेत. हे अॅप्स क्रिप्टोकरन्सीसंबंधित अॅप्स आहेत, ज्यात BitFunds, Bitcoin Miner, Bitcoin इत्यादींचा समावेश आहे. हे अॅप्स गेल्या काही महिन्यांपासून युजर्सच्या क्रिप्टोकरन्सीची माहिती चोरत असल्यामुळे गुगलने ही कारवाई केली आहे. जर तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये हे अॅप्स असतील तर तुम्ही त्वरित अनइन्स्टॉल करा आणि डेटा देखील डिलीट करा.
गुगलने क्रिप्टोकरन्सी संबंधित 8 अॅप्स बॅन केले आहेत. यात 2 अॅप्स पेड सब्स्क्रिप्शन देतात त्यामुळे काही युजर्स दर महिन्याला $15 म्हणजे जवळपास 1,115 रुपये खर्च करत होते. सिक्योरिटी रिसर्च फर्म Trend Micro ने दिलेल्या माहितीनुसार, हे अॅप्स इन्स्टॉल केल्यावर युजर्सची माहिती गोळा करतात. माहिती मिळवल्यावर युजर्सना जबरदस्ती जाहिराती दाखवल्या जात होत्या, तसेच व्हायरस देखील पाठवतात. ही माहिती समोर आल्यानंतर Google ने हे अॅप्स Play Store वरून काढून टाकले आहेत. हे देखील वाचा: 6000mAh बॅटरी असलेल्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; आता इतक्या किंमतीत मिळणार Galaxy M21 2021 Edition
अजून 120 पेक्षा जास्त नकली क्रिप्टोकरन्सी अॅप्स अँड्रॉइडवर उपलब्ध असल्याचे Trend Micro ने सांगितले आहे. हे अॅप्स माहिती गोळा करून जबरदस्ती जाहिरात दाखवतात. अश्या अॅप्सपासून वाचण्यासाठी युजर्सनी रिव्यू वाचावे, असा सल्ला रिसर्च फर्मने दिला आहे. हे देखील वाचा: लई भारी! आता एक क्लिकमध्ये कळणार शरीरातील पाण्याचे प्रमाण; Apple Watch मध्ये मिळू शकतो हायड्रेशन सेन्सर
क्रिप्टोकरन्सी संबंधित बॅन केलेले 8 अॅप्स:
Ethereum (ETH) – Pool Mining Cloud
Bitcoin 2021
BitFunds – Crypto Cloud Mining
Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet
Bitcoin Miner – Cloud Mining
Crypto Holic – Bitcoin Cloud Mining
Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System
MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner