मुंबई- गुगल मॅप आधी तीन विविध प्रकारे प्रवास करणाऱ्यांना जास्त फायद्याचं होतं. स्वतः कार ड्राइव्ह करणारे, ट्रेन किंवा बसने प्रवास करणारे आणि चालत प्रवास करणाऱ्यांना गुगल मॅप योग्य रस्ता दाखविण्याचं काम करत होतं. पण नुकतंच आलेलं नवं अपडेट खास बायकर्ससाठी आहे. बायकर्सला म्हणजेच दूचाकी चालकांना योग्य रस्त्याचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. टू-व्हिलर मोड हे नवं फीचर गुगल मॅपमध्ये आलं आहे. या नव्या फीचरमध्ये टू-व्हिलर चालकाला नियोजीत ठिकाणी पोहचण्याचा सर्वात जलद मार्ग, शॉर्टकट्स दाखविले जाणार आहे.
बायकर्ससाठी प्रवास सोपा व्हावा, असा हेतू समोर ठेवून गुगलने मॅपमध्ये नव फीचर आणलं आहे. असेही काही रस्ते आहेत ज्यावरून ट्रक, कार आणि बसेस जाऊ शकत नाहीत. पण त्याच रस्त्यांवरून टू-व्हिलर सहज जाऊ शकते. नव्या फीचरमधून असेच रस्ते गुगल मॅपकडून दाखविले जाणार आहेत. गुगल मॅचमधील टूव्हिलर मोड हे ऑप्शन सिलेक्ट केल्यावर असेच मोकळे रस्ते दाखविले जातील ज्याचा फायदा डेस्टिनेशनवर जलद पोहचण्यासाठी होईल.
भारतात दूचाकी चालविणारी सगळ्यात जास्त लोक आहेत. तसंच त्यांची नेव्हीगेशनची मागणी कार चालकांपेक्षा वेगळी आहे. टू-व्हिलर मोडमध्ये रूट आणि शॉर्टकट्सही दाखविले जाणार आहे. एन्ड्रॉइड युजर्ससाठी हे नवं फीचर सध्या उपलब्ध असून लवकरच आयएसओ युजर्सला या फीचरसाठी अजून तरी वाट पाहावी लागणार आहे. गुगल मॅपमध्ये टू-व्हिलर मोड फीचर भारतात पहिल्यांदा लाँच केलं गेलं आहे. भारतात टू-व्हिलर चालविणारी जास्त लोक असून लाखो लोक त्यांच्या नियोजीत ठिकाणी पोहचण्यासाठी नेव्हिगेशन वापरतात. चारचाकी चालकांच्या मागणीपेक्षा दूचाकी चालविणाऱ्यांची नेव्हिगेशनची मागणी वेगळी असते, असं गुगलचे उपाध्यक्ष सीजर सेनगुप्ता यांनी म्हंटलं.
टू-व्हिलर मोड मॅपमध्ये कार आणि ट्रक यांच्या सोयीनुसार रस्ते दाखविले जाणार नसून दूचाकी चालकांना उपयुक्त रस्ते दाखविले जातील. मशिन लर्निंगमुळे कस्टमाइज्ड ट्रॅफिकची माहिती आणि रूट, पार्किंगची माहितीही समजेल. बाइक चालविचाना चालक मोबाइल पाहू शकत नाही त्यामुळे गाडी चालवायला सुरूवात करण्याआधी रस्त्यावर असणारे लँडमार्क मॅपमध्ये सोप्या पद्धतीने दाखविले जातील ज्यामुळे चालकाला नियोजीत जागा मिळेल. गुगल मॅपमधील नवं फीचर लाँच करण्याची सुरूवात भारतापासून केली जातं असून त्यानंतर इतर देशात लाँच हे फीचर लाँच केलं जाणार आहे.