नवी दिल्ली : इंटरनेटवरील सर्च इंजिन अशी ओळख असलेल्या गुगलने आता आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गुगलने फिटनेस ट्रॅकिंग डिव्हाईस तयार करणारी कंपनी फिटबिट विकत घेण्यास प्रयत्नशील आहे. जगातील सर्वात मोठी असलेली टेक कंपनी फिटबिट 2.1 अब्ज डॉलरला गुगल खरेदी करणार आहे. या डीलसोबत गुगल आता हेल्थ सेक्टरमध्ये पाऊल टाकणार आहे. दरम्यान, गुगल फिटनेश मिशनला पुढे घेऊन जाईल असा विश्वास फिटबिट कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
जगभरात 2.8 कोटी युजर्सफिटबिट कंपनीकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, "आम्ही फिटनेस डिव्हाईस ब्रँडमध्ये स्थान निर्माण केले आहे. जगभरात फिटबिटचे जवळपास 2.8 कोटी युजर्स आहेत. कोट्यवधी लोक स्वत:ला फिट राखण्यासाठी आमच्या प्रॉडक्टवर विश्वास ठेवतात आणि जास्त अॅक्टिव्ह लाईफ जगत आहेत. आम्हाला विश्वास आहे की, गुगल या मिशनला पुढे नेईल."
प्रत्येक शेअरच्या बदल्यात 7.35 डॉलर देणार गुगलगुगलने प्रत्येक शेअरच्या बदल्यात 7.35 डॉलर फिटबिटला देऊ केले आहेत. ज्याची एकूण किंमत जवळपास 2.1 अब्ज डॉलर इतकी आहे.
Google Pay आता झाले आणखी जास्त सुरक्षित!UPI पेमेंट करण्यासाठी वापरण्यात येणारे Google Pay अॅप आता आणखीनच सुरक्षित करण्यात आले आहे. या अॅपमध्ये बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन फीचर आणले आहे. त्यामुळे Google Pay अॅपवरून आता कोणतेही डिजिटल व्यवहार करताना ग्राहक बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन फीचरचा वापर करू शकतात. या नवीन फीचरला 2.100 व्हर्जनसोबत रोल आऊट केला आहे.