मुंबई- गुगलने आज डुडलच्या माध्यमातून भारतातील प्रसिद्ध चिपको आंदोलनाची आठवण काढली आहे. आज या आंदोलनाला ४५ वर्षे झाली. जंगल वाचवण्यासाठी खेड्यातील महिलांनी अनोख्या पद्धतीनं लढवलेल्या या आंदोलनाची दखल गुगलनं घेतली असून डुडलच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत हे आंदोनल पोहोचविण्यासाठी डुडल साकारण्यात आलं आहे. गुगलने बनवलेल्या डुडलमध्ये एका झाडांच्या भोवती चारही बाजुंनी महिलांनी हातात हात देत गोल मानवी साखळी बनवलेली दिसत आहे. झाडाला तोडण्यापासून वाचविण्यासाठी या महिला झाडांना चिकटून उभ्या आहेत.
संपूर्ण भारतात जंगल वाचवण्यासाठी लोकांनी शांततेचा मार्ग अवलंबला होता. ज्या ठिकाणी ठेकेदार झाडांची कत्तल करण्यासाठी जात त्या ठिकाणी चिपको आंदोलनकर्ते झाडांना मिठी मारत 'चिपको आंदोलन' करत असत. झाडांची कत्तल रोखण्यासाठी केलेलं आंदोलन हे महात्मा गांधींच्या अहिंसा धोरणावर आधारित होतं. गौरा देवी यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. गौरा देवी यांना पुढे 'चिपको वुमन' या नावानेही ओळखलं जायचं.
कशी झाली आंदोलनची सुरूवात?चिपको आंदोलनाची सुरूवात पर्यावरण वाचविण्यासाठी झाली. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यापासून याची सुरूवात झाली. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील अलकनंदा घाटीच्या मंडल गावातील लोकांनी हे आंदोलन सुरू केलं. 1973मध्ये वन विभागाच्या ठेकेदारांनी जंगलाचील झाडं कापायला सुरूवात केली. त्याचवेळी चिपको आंदोलन उदयास आलं. या आंदोलनात भाग घेणाऱ्यांमध्ये गौरा देवी यांच्याशिवाय धूम सिंह नेगी, बचनी देवी आणि सुदेशा देवी यांचांही सहभाग आहे. गांधीवादी सुधारक सुंदरलाल बहुगुणा यांनीही या आंदोलनाला दिशा दिली. गांधीवादी सुधारक सुंदरलाल बहुगुणा यांनी या आंदोलनाला दिशा दिली होती. व याची दखल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना घ्यावी लागली होती. आज या सर्व आंदोलनाला उजाळा देण्यासाठी गुगलने 'डुडल' बनवले आहे.