नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. मात्र आज लोकप्रिय सर्च इंजिन गुगलचा 21 वा वाढदिवस आहे. गुगलने यानिमित्ताने एक खास डुडल तयार केले आहे.
गुगलने 27 सप्टेंबर 1998 ही तारीख एका संगणकाच्या डेस्कटॉपवर दाखवली आहे. गुगलचं एक सर्च पेज दाखवण्यात आलं आहे. गुगलचा जुना लोगोही दिसत आहे. संगणकासोबतच कीबोर्ड, माऊस आणि प्रिंटरही दाखवण्यात आला आहे. 1998 मध्ये सर्गी ब्रिनआ णि लॅरी पेज यांनी गुगलची स्थापना केली होती. सुरुवातीला गुगलचं नाव 'Backrub' असं ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर ते बदलून गुगल असं ठेवलं आहे.
गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. 1998 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी गुगल हे सर्च इंजिन सुरू केलं. या सर्च इंजिनने 20 वर्षांत खूप प्रगती केली गुगल 100 पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. जगभरात गुगलची कार्यालये आहेत. तसेच मोठ्या संख्येने लोक त्याचा वापर करतात.
नोकरी शोधणं होणार आणखी सोपं; Google ने लॉन्च केली 'ही' नवी सर्व्हिस
गुगलने Google Pay च्या माध्यमातून नोकरी शोधण्यासाठी एक पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. गुगल पे च्या माध्यमातून तरुणांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी थेट अर्ज करता येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुगलने Google Job Search हे फीचर याआधी लॉन्च केले आहे. मात्र आता अशाच पद्धतीचे फीचर हे गुगल पे अॅपमध्ये युजर्सना मिळणार आहे. या फीचरचा तरुणांना नोकरी शोधण्यासाठी फायदा होणार आहे. तसेच याच्या माध्यमातून बेसिक आणि पार्ट टाईम जॉब शोधण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी गुगलने अनेक कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. गुगल पे मध्ये नोकरी संबंधी एक पर्याय देण्यात येणार आहे. त्यामध्ये युजर्स आपलं प्रोफाईल तयार करू शकतात. तसेच शिक्षण आणि अनुभव याची माहिती देऊ शकतात.
खूशखबर! मोबाईल डेटाने टीव्ही पाहता येणार; गुगलने आणलं दमदार फीचरगुगलने भारतात Android TV साठी एक नवीन फीचर रोलआऊट केले आहे. वाय-फाय कनेक्शन नसणाऱ्या तसेच मोबाईल डेटा आणि हॉटस्पॉटच्या मदतीने टीव्ही पाहणाऱ्या युजर्ससाठी खास गुगलने हे नवं फीचर आणलं आहे. यासोबतच गुगलने एक कास्ट फीचर लॉन्च केलं आहे ज्याच्या मदतीने युजर्स डाऊनलोड केलेल्या मीडिया फाईल्स देखील टीव्हीवर पाहू शकणार आहेत. गुगलच्या वतीने जोरिस वान मेंस यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डेटा सेव्हर, डेटा अलर्ट्स आणि हॉटस्पॉट गाईड असे फीचर्स असणार आहेत. लिमिटेड मोबाईल डेटावर स्मार्ट टीव्ही पाहणाऱ्या भारतीय युजर्ससाठी ते लॉन्च करण्यात आले आहेत. पहिलं फीचर डेटा सेव्हरच्या मदतीने वॉच टाईम जवळपास तीन पटीने वाढवला जाऊ शकतो असा दावा गुगलने केला आहे. तसेच मोबाईल कनेक्शनवर कमी डेटाचा वापर केला जाईल. किती डेटा आतापर्यंत वापरला गेला तर किती शिल्लक आहे याची माहिती ही डेटा अलर्ट्स युजर्सना देणार आहे. हॉटस्पॉट गाईड युजर्सना मोबाईल हॉटस्पॉटसोबत टीव्ही सेटअप करण्यासाठी मदत करणार आहे.