नवी दिल्ली- माइक म्यूट न करणं हा आता एक ट्रेंड बनला आहे. लोकं जाणुनबुझून असं करत नाहीत पण नकळत घडलेली ही चूक महागात पडू शकते. एकदा मुलगी माइक म्यूट करायला विसरली तर कधी कुणी ऑफिसलमधील गॉसिप सांगू लागलं. माइक म्यूट न केल्याने अनेकांची पंचाईत झाली. जे व्हायला नकोच तेच होऊन बसलं. का आपण माइक म्यूट केला नाही याचा स्वत:वरच राग काढला जातो. ऑनलाईन मिटिंगमध्ये तर माइक म्यूट न केल्याने घडलेले किस्से सोशल मीडियात चांगलेच चर्चेत आले.
असाच काहीसा प्रकार Google चे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासोबत घडला आहे. सुंदर पिचाई भलेही गुगलचे सीईओ असो, पण तेदेखील आपल्या सर्वांसारखेच एक आहेत. वर्चुअल व्हिडीओ कॉलच्या बैठकीवेळी सुंदर पिचाई त्यांचा माइक म्यूट करणं विसरले. पिचाई यांनी बुधवारी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात केर्मिट द फ्रॉगसोबत मजेशीर किस्सा सांगितला आहे. पिचाई यांनी प्रसिद्ध मपेट कॅरेक्टर यांच्याशी संवाद साधला. केर्मिटला सीसेम स्ट्रीटसारखं लहान मुलांसाठी बनवलं गेले आहे अमेरिकन टेलिव्हिजनवर अनेकदा पाहिलं जातं. सुंदर पिचाई यांच्याशी केर्मिट २ मिनिट १९ सेकंद चर्चा झाली.
व्हिडीओच्या सुरुवातीला केर्मिटनं सुंदरला अभिवादन करत म्हटलं की, नमस्ते, सुंदर. पिचाई यांनीही त्याला उत्तर दिलं. परंतु सुंदर पिचाई यांच्याकडून कुठलाही आवाज आला नाही. तेव्हा केर्मिटने इशारा करत सांगितले की, सुंदर मला वाटतं तुमचा माईक म्यूट आहे. मपेटनं त्याच्या शब्दात सांगितलं की, वाह, विश्वास होत नाही मी Google च्या सीईओंसोबत बोलतोय आणि ते म्यूट आहेत.
केर्मिटचा इशारा पाहताच हसत हसत सुंदर यांनी तांत्रिक दुरुस्ती करत मेपटला म्हणाला की, क्षमा करा, मी म्यूटवर होतो. मी यावर्षी असं अनेकदा केले आहे. मी तुमचा आणि मपेट्सचा खूप मोठा चाहता आहे. सुंदर पिचाई यांच्या कौतुकाला उत्तर देत केर्मिटनं मीदेखील Google चा चाहता आहे. याच प्लॅटफॉर्मचा वापर करून या ग्रहावरील बेडकांच्या ८ हजाराहून अधिक प्रजातीचा शोध घेण्यात मला यश आलं. सुंदर यांनी Youtube च्या डियर अर्थ इवेंटबाबत केर्मिटशी संवाद साधला. एपिक ग्लोबल सेलिब्रेशन ऑफ आवर प्लेनेटच्या रुपात त्याचे वर्णन केले. जलवायू परिवर्तनावर होणारे परिणाम कमी करता यायला हवेत. २४ ऑक्टोबरला याबाबत एक कार्यक्रम दाखवला गेला. जो १ ता ४३ मिनिटांचा होता. या कार्यक्रमात म्युझिक, एक्टिविस्ट, क्रिएटर्स आणि प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश होता.