जगभरात ब्राऊझिंगसाठी गुगल क्रोम (Google Chrome) चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. स्मार्टफोन असो किंवा मग संगणक, सर्व इंटरनेट युजर्स Google Chrome मध्ये ब्राऊझ करतात. गुगल क्रोम ब्राऊझरमध्ये Incognito मोडदेखील मिळतो. म्हणजेच आपल्याला प्रायव्हसी हवी असेल अथवा सिक्रेट ब्राऊझिंग करायचं असेल तर या मोडचा वापर हा हमखास केला जातो. मात्र आता हा Incognito मोडही सुरक्षित नसल्याची माहिती समोर आली आहे. गुगलने सर्व युजर्सना एक मोठा धक्का देत याबाबतचा खुलासा केला आहे. Incognito मोडवरही ट्रॅकिंग केलं जातं.
गुगल क्रोमकडे तुम्ही Incognito मोडवरुन केलेल्या ब्राऊझिंगबाबतचा ट्रॅक रिपोर्ट असतो. या माहितीनंतर अमेरिकेतील तीन युजर्सनी गुगलला थेट कोर्टात खेचलं आहे. तसेच त्यांनी कंपनीवर तब्बल 3600 कोटी रुपयांचा खटला भरला आहे. गुगलने आपल्या स्पष्टीकरणात आम्हाला असं वाटत होतं की, लोकांना माहिती असेल की आम्ही Incognito मोडवरही त्यांना ट्रॅक करतो असं म्हटलं आहे. तसेच गुगलने पुढे Incognito म्हणजे invisible नव्हे असं देखील म्हटलं आहे. त्यामुळे क्रोम युजर्सकडे एक कॉमन सेन्स असायला हवा की, त्यांचा डेटा ट्रॅक केला जात आहे.
कॅलिफोर्नियाच्या एका न्यायाधीशांनी हे स्पष्ट केले आहे की ते कंपनीविरूद्धचा खटला रद्द करणार नाहीत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अमेरिकन जिल्हा न्यायाधीश लुसी कोह (Lucy Koh) यांन दिलेल्या माहितीनुसार, कंपनी युजर्सचा डेटा ट्रॅक करत आहे, याबाबतची माहिती गुगलने त्यांच्या युजर्सना दिली नाही. गुगलने कोर्टात दावा दाखल केला आहे की, Incognito चा अर्थ invisible असा होत नाही. जर या मोडचा वापर करत युजरला कोणत्याही वेबसाईटवर जायचे असेल तर त्या वेबसाइटची माहिती ट्रॅक केली जाईल. त्याच वेळी त्या वेबसाईटवर उपस्थित थर्ड पार्टी सर्व्हिसेसनाही युजर्सविषयीची माहिती मिळते.
गुगलने त्यांच्या निवेदनात पुढे Incognito मोड युजर्सना कोणत्याही अॅक्टिव्हिटीशिवाय ब्राऊझ करण्याची परवानगी देतो. म्हणजेच या मोडच्या मदतीने तुमच्या अॅक्टिव्हिटी तुमचं डिव्हाईस किंवा ब्राऊझर रेकॉर्ड करत नाही. मात्र तुम्ही या मोडमधे कोणत्याही वेबसाईटवर गेल्यास तुमचा डेटा कलेक्ट केला जातो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याच दरम्यान गुगल क्रोम ब्राऊजर (Google Chrome Browser) आता युजर्ससाठी आणखी कडक सुरक्षा (Security) करण्याच्या तयारीत आहे. गुगल क्रोम लवकरच एचटीटीपीला (http) डिफॉल्ट रुपात वापर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यावेळी युजर्स एचटीटीपी (http) आणि एचटीटीपीएस (https) प्रीफिक्स लिहिण्यास विसरतात, त्यावेळी हे उपयोगी ठरणार आहे.
Google Chrome ब्राऊजर आता आणखी सेफ; कडक सिक्योरिटीचा युजर्सला फायदाच फायदा होणार, जाणून घ्या कसा
ब्राऊजरची सुरक्षा वाढवण्यासाठी क्रोम इंजिनिअर्सनी केलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे. सध्या एखाद्या युजरने एखादी लिंक टाईप केल्यास, क्रोम एड्रेस बार (यूआरएल), क्रोम प्रोटोकॉलची चिंता न करता टाईप केलेली लिंक लोड करतो. मात्र युजर्सनी प्रोटोकॉल न जोडल्यास, आता क्रोम प्रीफिक्स http जोडेल आणि http च्या माध्यमातून डोमेन लोड करण्याचा प्रयत्न करेल. क्रोम सुरक्षा इंजिनिअर एमिलि स्टार्कने दिलेल्या माहितीनुसार, हा बदल क्रोम 90 मध्ये बदल असेल. Chrome मधील सुरक्षित ब्राउझिंग आपोआप धोकादायक जाहिरातींपासून युजर्सचं संरक्षण करेल आणि धोकादायक साईट्सवर भेट देण्यापूर्वी किंवा संशयास्पद फाईल डाउनलोड करण्यापूर्वी युजर्सला इशारा देईल, यामुळे युजर्सला मोठा फायदा होणार आहे.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....