गुगलच्या कर्मचाऱ्यांनी क्रोम ब्राऊजरमधील एका हॅकचा शोध लावला आहे. कंपनीने आपल्या ब्लॉगमधून याची माहिती दिली आहे आणि युजर्सना त्वरित क्रोम ब्राऊजर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. हे जगातील 2 अब्ज गुगल क्रोम ब्राउजर युजर्ससाठी वाईट बातमी आहे. कंपनीने CVE-2021-37973 साठी एक एक्सप्लॉइट मिळाल्याची माहिती मिळाली आहे, जो एक zero-day एक्सप्लॉइट आहे. म्हणजे गुगलला समजण्याआधी सायबर क्रिमिनल या हॅकचा फायदा घेऊन झाले आहेत.
गुगलने या हॅकचा शोध लागल्यानंतर क्रोम वापरकर्त्यांना आपला ब्राउजर अपडेट करण्याची सूचना दिली आहे. या झिरो डे हॅकमुळे जवळपास सर्व Google Chrome युजर्सना हॅक होण्याचा धोका आहे. कंपनीने या एक्सप्लॉइटची माहिती एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
Google Chrome zero-day hack
कंपनीच्या ब्लॉगनुसार, CVE-2021-37973 चा एक्सप्लॉइट गुगल कर्मचाऱ्यांनी शोधून काढला होता. हा एक zero-day एक्सप्लॉइट आहे, त्यामुळे जर गुगलला याची माहिती आधी मिळाली असती तर कंपनीने अपडेट जारी केला असता. सायबर गुन्हेगार या हॅकचा फायदा घेऊ शकत होते. तसेच जोपर्यंत सर्व युजर्स क्रोम अपडेट करत नाहीत तोपर्यंत या बगचे विवरण गुपित ठेवण्यात येईल.
कंपनीने ही समस्या सोडवण्यासाठी पॅच जारी केला आहे आणि युजर्सना शक्य तितक्या लवकर आपला ब्राउजर अपग्रेड करण्यास सांगितले आहे.
अशाप्रकारे मिळावा Google Chrome ब्राउजरचा अपडेट:
- Google Chrome च्या सेटिंग्समध्ये जा
- Help मधील Google Chrome च्या About सेक्शन मध्ये जा
- इथे तुमच्या क्रोमचे व्हर्जन चेक करा
- Google Chrome व्हर्जन 94.0.4606.61 किंवा त्यावरील व्हर्जन सुरक्षित आहे
- जर तुमच्याकडे हे व्हर्जन नसेल तर अपडेटचा ऑप्शन मिळेल.