आज जर तुम्ही Google चं होम पेज ओपन केलं तर तुम्हाला डूडलच्या माध्यमातून 'पिझ्झा कटिंग' गेम दिसेल. या गेममध्ये युजर्सना पिझ्झाच्या स्लाइज करायच्या आहेत, सुरवातीला सोप्पा वाटणारा हा गेम पुढे आणखीन कठीण होत जातो. या गेम मागील कारण म्हणजे आजच्या दिवशी 6 डिसेंबर 2007 मध्ये UNESCO च्या रेप्रजेन्टटिव लिस्टमध्ये Neapolitan ‘Pizzaiuolo’ बनवण्याच्या विधीचा समावेश केला गेला होता.
त्यामुळे नेहमीप्रमाणं जर तुम्ही काही सर्च करण्यासाठी Google ओपन केलं तर, तुम्हाला सर्च पेजवर गुगलचं खास डूडल दिसेल. आजच्या डुडलमध्ये एक मोठा पिझ्झा दिसेल. Google च्या स्पेलिंगमधील पहिला O प्ले बटन आहे तर दुसरा O पिझ्झाच्या रूपात दाखवण्यात आला आहे. प्ले बटनवर क्लिक केल्यावर Pizza slicing गेम सुरु होतो.
या गेममध्ये 11 प्रारकाचे पिझ्झा येतात, ज्यांच्या स्लाईस म्हणजे तुकडे करण्याचं काम करायचं आहे. परंतु ते तुकडे किती करायचे आणि कसे करायचे यावर गेम अवलंबुन आहे. गेममध्ये मार्गेरिटा पिझ्झा, पेपरोनी पिझ्झा, व्हाईट पिझ्झा, कॅलाब्रेसा पिझ्झा, मॉझरेला पिझ्झा, हवाईन पिझ्झा, मॅग्यारोस पिझ्झा, टेरीयाकी मेयॉनीज पिझ्झा, टॉम यम पिझ्झा, पनीर टिक्का पिझ्झा, स्वीट पिझ्झा अशा 11 प्रकारचे पिझ्झा येतात. सुरुवातीला सोप्पा वाटणारा गेम लेव्हल अप झाल्यावर कठीण होत जातो.