Google Find My Device Update: अनेकदा आपला मोबाईल फोन आपण कुठेतरी ठेवून विसरतो किंवा चोरीला जातो. चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन आपल्याला लवकरच सापडत नाही. पण, आता चिंता करण्याची गरज नाही. कारण Google अँड्रॉइड फोनमध्ये एक खास फीचर देते, ज्याच्या मदतीने तुम्ही हरवलेला फोन लगेच शोधू शकता.
या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनचे लोकेशन ट्रॅक करू शकतात. या फीचरचे नाव Find My Device असे आहे. गुगल सध्या हे फीचर आणखी सुधारण्यात गुंतले आहे, जेणेकरून ते अॅपलला स्पर्धा देऊ शकतील. अॅपल आपल्या ग्राहकांना Find My Network हे फीचर देते. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले आयफोन, आयपॅड, मॅक आणि एअरटॅग ट्रॅक करू शकतात. अॅपलचे हे फीचर डिव्हाइस वायफाय किंवा ब्लूटूथ रेंजच्या बाहेर असताना किंवा डिव्हाइस बंद असतानाही काम करते.
Google नवीन अपडेट आणणारदुसरीकडे, Google चे Find My Device फीचर केवळ तेच फोन ट्रॅक करू शकते, जे युजरच्या Google खात्याशी लिंक आहेत. यामध्ये लवकरच बदल होऊ शकतो. डिसेंबर 2022 मध्ये रिलीज झालेल्या प्ले सिस्टम अपडेट पॅच नोटमध्ये त्याचे संकेत मिळाले आहेत. Google ने संकेत दिले आहेत की, लवकरच Android युजर्सना Find My Device Network सारखे फीचर मिळेल. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले अँड्रॉईड फोन ट्रॅक करू शकतील. Google लवकरच हे अपडेट रोलआउट करू शकते.