सध्या Google जबरदस्त चर्चेत आहे. गुगलने नुकतेच 6 टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिले होते. यानंतर टेक जगतात भूकंप आला. नारळ मिळाल्यानंतर अनेक माजी कर्मचाऱ्यांनी लिंक्डइनवर आपली भडास काढली होती. आता Google India ने LinkedIn वर मोठ्या प्रमाणावर जॉब व्हॅकन्सी पोस्ट केल्या आहेत. पिचाई यांनी म्हटल्या प्रमाणे, छाटणीचा सर्वाधिक परिणाम अमेरिकन कर्मचाऱ्यांवर होईल. अद्याप इतर बाजारांत छाटणी बाकी आहे. अर्थात अद्याप भारतामध्येकर्मचारी कपात बाकी आहे.
भारतातही होणार कर्मचारी कपात -पिचाई यांनी कर्मचाऱ्यांनी पाठवलेल्या कपातीच्या मेलमध्ये म्हटले आहे की, "आम्ही यापूर्वीच अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना एक वेगळा इमेल पाठवला आहे. इतर देशांत स्थानिक कायदे आणि पद्धतीमुळे या प्रक्रियेला अधिक वेळ लागेल."
गूगलमध्ये बम्पर भरती -कंपनी लवकरच भारतातही कर्मचारी कपात करण्यास सुरुवात करेल, असा अंदाज आहे. कंपनीने लिंक्डइनवर पोस्ट केलेल्या व्हॅकन्सीज मध्ये मॅनेजर, स्टार्टअप सक्सेस टीम, एम्प्लॉई रिलेशन्स पार्टनर, स्टार्टअप सक्सेस मॅनेजर, गूगल क्लाउड, व्हेंडर सोल्यूशन्स कंसल्टन्ट, गूगल क्लाऊड, प्रोडक्ट मॅनेजर, डेटाबेस इनसाइट्स आणि इतरही काही. या नोकऱ्या हैदराबाद, बेंगलोर आणि गुरुग्रामसह संपूर्ण Google कार्यालयांमध्ये आहे.
कर्मचारी कपातीमुळे 12000 कर्मचारी प्रभावित -कर्मचारी कपातीची संपूर्ण जबाबदारी कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी घेतली आहे. याशिवाय, जेव्हा अधिक मागणी होती, तेव्हा कंपनीने महामारीच्या काळात ओव्हरहायर केले. मात्र आता वर्कफोर्स आवश्यकतेपेक्षा अधिक झाला आहे, असेही त्यांनी म्हटले होते.