जुलै 2021 पर्यंत जगाची लोकसंख्या (world's population) ही 7.9 अब्ज नोंदविली गेली आहे. मात्र, गुगलच्या (Google) एका अॅपने यापेक्षाही जास्त वेळा डाऊनलोड मिळविले आहेत. चकीत झालात ना, एवढी लोकसंख्या तरी मोबाईल वापरते का, असा प्रश्न पडला असेल. परंतू हे खरे आहे. (Google's youtube app download more than world's population.)
गुगलच्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉईडने यंदा 3 अब्ज डिव्हाईस अॅक्टिव्हेशनचा टप्पा गाठला आहे. याचबरोबर गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध अॅपची संख्या ही 2.89 दशलक्ष झाली आहे. यात युट्यूब (youtube app) हे असे अॅप आहे जे जगात सर्वाधिक वेळा आणि जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूप अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. युट्यूब हे आजवर 10 अब्जांहून अधिकवेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. (Youtube 10 billion downloads.)
युट्यूब जगातील सर्व अँड्रॉईड फोनमध्ये इनबिल्ट येते, यामुळे ते डाऊनलोड करण्याची वेळच येत नाही. मग एवढे नंबर कसे आले हा देखील कोड्यात टाकणारा विषय बनला आहे. प्ले स्टोअरवर दुसरे लोकप्रिय अॅप फेसबुक आहे. हे अॅप 7 अब्ज वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅप तिसऱ्या नंबरवर असून 6 अब्ज वेळा डाऊनलोड केले आहे. धक्कादायक म्हणजे फेसबुक मॅसेंजर चौथ्या स्थानी आहे आणि 5 अब्ज वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. इन्स्टाग्राम 3 अब्ज डाऊनलोडसह पाचव्या स्थानी आहे. (List of most-downloaded Google Play applications)
TikTok 2 अब्ज डाऊनलोड, सबवे सर्फर्स 1 अब्ज, फेसबुक लाईट 2 अब्ज, Microsoft Word आणि Microsoft Powerpoint 2 अब्ज वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. स्नॅपचॅट 1 अब्जहून अधिकवेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. (which app more time download in world? Google's youtube download more than world's population)