Google ने दरवर्षी प्रमाणे Google for India चे आयोजन आज केले होते, या इव्हेंटचे 7वे वर्ष आहे. या ऑनलाईन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या युट्युब चॅनेलवरून करण्यात आले आहे. तसेच या इव्हेंटसाठी खास साईट देखील लाईव्ह करण्यात आली होती. गुगलने या इव्हेंटमध्ये भारतीय बाजारात उपलब्ध होणाऱ्या गुगल प्रोडक्ट्स आणि योजनांची माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया गुगलने या इव्हेंटमधून कोणत्या नवीन घोषणा केल्यात आहेत.
Google for India 2021 मधील घोषणा
- Google Pay वर लवकरच My Shop Feature येईल, ज्याच्या मदतीने छोटे दुकानदार आपल्या दुकानातील वस्तू गुगल पेवर शोकेस करू शकतील.
- Google Pay पेमेंटच्या वेळी बोलून बँक अकॉउंट नंबर टाकण्याचे फिचर लवकरच देण्यात येईल.
- Google Pay वर पुढील वर्षी हिंदी आणि इंग्रजीचे मिश्रण म्हणजे हिंग्लिशचा ऑप्शन मिळेल.
- गुगलने भारतात उपलब्ध असलेल्या 6 ते 8 हजार रुपयांमधील अनेक गुगल सर्टिफाइड कोर्सची माहिती दिली. तसेच कंपनीने NASSCOM फाउंडेशन आणि Tech Mahindra सोबत स्कॉलरशिपसाठी केलेल्या भागेदारीची देखील माहिती दिली आहे.
- गुगल क्लासरूमवर युजर्सना क्लास वर्क डाउनलोड करण्याचा पर्याय देण्यात येईल.
- गुगल करियर सर्टिफिकेटची देखील या इव्हेंटमध्ये चर्चा झाली. यासाठी गुगल Coursera सह काम करत आहे. त्यामुळे आयटी-मॅनेजमेंट, यूएक्स डिजाइन आणि डिजिटल करियर इत्यादी क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी गुगल स्कॉलरशिप मिळेल.
- सध्या हिंदी आणि इंग्रजीसाठी उपलब्ध असलेले Google Read Aloud फीचर फीचर लवकरच अन्य भारतीय भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध होईल.