गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर ChatGPT ची चर्चा सुरू आहे. हे टूल Google Search सारखे असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. आता गुगलच्या एका निर्णयामुळे चॅटजीपीटीनं गुगल सर्चसाठी अडचणी निर्माण केल्याचं स्पष्ट झालं आहे. ChatGPT हा Open AI Nan च्या कंपनीने तयार केलेला चॅटबॉट आहे. एका आठवड्यात या चॅटबॉटला करोडो वापरकर्त्यांनी पसंती दिली आहे. अनेकांनी याकडे गुगल सर्चचा प्रतिस्पर्धी म्हणूनही पाहत आहेत.
एका अहवालानुसार, ChatGPT ची वाढती लोकप्रियता पाहता गुगलने कोड रेड जारी केला आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी टीमला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय च्या उत्पादनांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Google ची मूळ कंपनी Alphabet चे CEO सुंदर पिचाई यांनी Google AI धोरणाबाबत बैठका घेतल्या आहेत. चॅटजीपीटीला कसे सामोरे जावे, म्हणजेच चॅटजीपीटीकडून गुगल सर्चला येणाऱ्या संभाव्य धोक्यांसाठी कोणती पावले उचलली जावीत यावर कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे.
NYT ने Google चे काही अंतर्गत मेमो आणि ऑडिओ प्राप्त केले आहेत. चॅटजीपीटीमुळे गुगल सर्चचे किती नुकसान होऊ शकते आणि त्याचा कसा सामना करता येईल याबाबत कंपनीचे व्यवस्थापन धोरण तयार करत आहेत. गुगल रिसर्च, ट्रस्ट आणि सेफ्टी डिव्हिजनसह काही इतर टीमना आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित उत्पादने आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काही कर्मचाऱ्यांना एआय-आधारित टूल्स तयार करण्यास सांगितले आहे जे मजकूरावर आधारित ग्राफिक्स तयार करू शकतात. ओपन एआयने काही दिवसापूर्वीच DALL E सादर केले होते. काही लिहले की त्या आधारावर तो तुम्हाला ग्राफिक्स किंवा आर्टवर्क बनवेल. DALL E देखील ChatGPT प्रमाणे लोकप्रिय झाले आहे आणि ही दोन्ही टूल्स Open AI ने तयार केली आहेत.