नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असल्याने वर्षभर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. एखाद्या गोष्टीची माहिती हवी असल्यास आपण प्रत्येकवेळी गुगलवर ती पटकन सर्च करतो. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. गुगलने बुधवारी (6 मार्च) Bolo अॅप लाँच केले आहे. बोलो अॅपमुळे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकण्यास मदत होणार आहे. भारतामध्ये हे अॅप सर्वप्रथम लाँच करण्यात आले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बोलो अॅपमध्ये आवाज ओळख आणि टेक्स्ट-टू-स्पीच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या अॅपमध्ये एक अॅनिमेटेड पात्र देण्यात आले आहे. हे पात्र लहान मुलांना हिंदी आणि इंग्रजीमधून गोष्टी आणि इतर मजकूर वाचण्यास प्रोत्साहित करणार आहे. जर मुलांचे वाचताना उच्चार चुकले, एखादा शब्द अडखळला तर ते पात्र योग्य पद्धीतने त्या शब्दाचा उच्चार करण्यास मदत करणार आहे.
गुगल इंडियाचे अधिकारी नितिन कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑफलाईन असताना ही या अॅपचा वापर करता यावा यासाठी त्यानुसार बोलो अॅपचे डिझाईन करण्यात आले आहे. 50 एमबीचे हे अॅप असून प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. बोलो अॅपमध्ये हिंदी आणि इंग्रजीच्या जवळपास 100 गोष्टी आहेत. हे अॅप सध्या फक्त अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये वापरता येणार आहे. तसेच भविष्यामध्ये मराठीसारख्या इतर भारतीय भाषांचाही यामध्ये समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचे कश्यप यांनी सांगितलं आहे. बोलो अॅपमुळे विद्यार्थांच्या मनातील इंग्रजीविषयीची भीती नाहीसी होण्यास मदत होणार आहे. उत्तर प्रदेशमधील 200 गावांमध्ये या अॅपची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. तसेच बोलो अॅपचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
ई-मेल करणं होणार आता अधिकच सोपं, Gmail मध्ये आले 'हे' नवीन फीचर्स
गुगलने गेल्या वर्षी Gmail मध्ये अनेक नवनवीन बदल केले होते. कंपनीने नवीन डिझाईन आणि फीचर्ससह Gmail लाँच केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्षभराने काही दिवसांपूर्वी ई-मेल सर्व्हिसमध्ये बदल करण्यात आले आहेत. गुगलने Gmail च्या कंपोज विंडोमध्ये Undo आणि Redo च्या शॉर्टकटचा समावेश केला आहे. Gmail च्या लेटेस्ट अपडेटमध्ये कंपोज विंडोच्या टास्क बारमध्ये Undo आणि Redo या शॉर्टकटचा समावेश करण्यात आला आहे. नवीन फीचर्स हे टास्कबारच्या एकदम सुरुवातीला अॅड करण्यात आला आहे. फॉन्ट टाईप आणि फॉन्ट साईझ पर्यायाआधी हे फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे युजर्सना आता मेल करताना या गोष्टीचा अत्यंत फायदा होणार आहे.