गुगल नेहमी आपल्या वापरकर्त्यांना नवीन अपडेट देत असते. गुगल मॅपचा वापर आपल्याकडे अनेकजण करतात. गुगलने आता एक मोठी अपडेट दिली आहे. गुगल मॅप्समध्ये सेव्ह केलेल्या लोकेशन हिस्ट्रीमध्ये बदल करण्यात येणार असल्याची घोषणा गुगलने गेल्या वर्षी केली होती. आता एका ब्लॉग पोस्टमध्ये, टेक जायंटने म्हटले आहे की वापरकर्त्यांना त्यांची टाइमलाइन फोनवर सेव्ह करण्याचा पर्याय असेल किंवा त्यांची इच्छा असेल तर ते क्लाउडवर एन्क्रिप्टेड कॉपीचा बॅकअप देखील घेऊ शकतात.
Google Maps लोकेशन हिस्ट्रीमध्ये केलेले बदल अद्याप सर्वांसाठी रोल आउट केलेले नाहीत. आता Google ने लोकेशन हिस्ट्री हटवण्यापूर्वी योग्य कारवाई करण्याचा इशारा देणारे ईमेल पाठवण्यास सुरुवात केली आहे.
गुगल मॅपचे लोकशन हिस्टरी हटविण्याशी संबंधित ईमेल अद्याप पाठविला जात आहे, त्यामुळे तुमच्यासाठी अंतिम मुदत इतर वापरकर्त्यांपेक्षा वेगळी असू शकते.
तुमची लोकेशन हिस्ट्री ऑफलाइन सेव्ह करण्याचे फिचर त्या वापरकर्त्यांसाठी निश्चित उत्तम आहे. ज्यांना त्यांची हिस्टरी Google सोबत शेअर करायचे नाही. पण कंपनी मागील ३ महिन्यांचा टाइमलाइन डेटा हटवेल. जर तुम्ही कोणतीही कारवाई केली नाही तर Google चे मत आहे की,पहिल्यांदा कंपनी तुमचा ३ महिन्यांचा टाइमलाइन डेटा हटवेल आणि नवीन लोकेशन हिस्ट्री डिव्हाइसवर संग्रहित केला जाईल.
Google पाठवत असलेल्या ईमेलमध्ये एक लिंक आहे जी तुम्हाला तुमचा टाइमलाइन डेटा मॅन्युअली हटवल्याशिवाय ठेवायचा की नाही हे निवडू देते. किंवा ते ३ महिन्यांनंतर आपोआप हटवले जाणार नाही.
अँड्रॉइड ऑथॉरिटीच्या ताज्या अहवालात असे दिसून आले आहे की, ज्या लोकांनी 'Keep until you delete ऑप्शन निवडले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचा टाइमलाईन डेटा डिलिट झाला आहे. म्हणून, Google च्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी पहिल्यांदा तुमची लोकेशन हिस्ट्री अगोदर एक्सपोर्ट करा.
यासाठी, पहिल्यांदा takeout.google.com वर जा आणि लोकेशन हिस्ट्री म्हणजेच टाइमलाइन वगळता सर्व काही अनचेक करा. यानंतर ‘नेक्स्ट स्टेप’ बटणावर क्लिक करा आणि नंतर ‘Create Export’ वर टॅप करा.
Google एका नवीन फिचरवर देखील काम करत आहे. जे वापरकर्त्यांना वैयक्तिक डिव्हाइसेसवरून त्यांचा टाइमलाइन डेटा एक्सपोर्ट करण्यास परवानगी देईल. डेटा एक्सपोर्ट करण्यासाठी आधी तुमच्या फोनच्या सेटिंग ॲपवर जा आणि नंतर लोकेशनवर जा आणि टाइमलाइन पर्यायावर जा. या ठिकाणी तुम्हाला तुमची लोकेशन हिस्ट्री एक्सपोर्ट करण्याचा पर्याय मिळेल.