Google Maps मध्ये लवकरच नवीन फिचर येणार आहे, जे युजर्सना पैसे वाचवण्यास मदत करेल. कंपनीनं Toll Feature ची घोषणा भारतासह निवडक देशांमध्ये केली आहे. या फिचरमुळे युजर्सना रस्त्यातील टोलच्या चार्जेसची माहिती मिळेल. त्यामुळे युजर्स टोल नसलेल्या किंवा कमी टोल असलेल्या रस्त्याची निवड करू शकतील. तुम्ही गुगल मॅपवर एखादं लोकेशन टाकून ट्रिप सुरु केली की त्या रस्त्यावरील सर्व टोल आणि त्यांच्या चार्जेसची माहिती मिळेल.
Google Maps चं हे नवीन फिचर फक्त निवडक देशांमध्ये सर्वप्रथम सादर करण्यात येईल. विशेष म्हणजे त्यात भारताचा समावेश करण्यात आला आहे. भारत, इंडोनेशिया, जापान आणि अमेरिकेतील युजर्सना एप्रिल 2022 च्या अखेरपर्यंत हे फिचर उपलब्ध होईल. लोकल टोलिंग ऑफिसरकडून मिळालेली माहिती गुगल मॅप्सवर दाखवण्यात येईल.
Google Maps Toll Feature
टोल प्राईस फीचरमध्ये युजर्सना त्यांच्या रूटवरील टोलची बेरीज करून मिळेल. यात टोल पास, आठवड्यचा दिवस, वेळ सारख्या वेगवेगळ्या गोष्टींची देखील मदत घेतली जाईल. गुगल मॅप्सवर 2,000 पेक्षा जास्त टोल असलेल्या रस्त्यांची माहिती उपलब्ध होईल. जर युजर्सना टोलचे पैसे वाचवायचे असतील, तर ते गुगल मॅपवर टोल-फ्री रस्त्याची मागणी करू शकतात. यासाठी युजर अॅपच्या वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करू शकतात आणि उपलब्ध असलेला पर्यायी मार्ग शोधण्यासाठी Avoid tolls चा ऑप्शन निवडू शकतात.