कोरोना संकट काळात अनेकांचे काम घरातून सुरु होते. यादरम्यान युजर्संना काम करताना अडचणी येऊ नये, यासाठी सर्च इंजिन कंपनी गुगले आपल्या Google Meet सर्व्हिस पूर्णपणे मोफत केली होती. मात्र, आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. गुगलने आपल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप Google Meet संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. माहितीनुसार, गुगल आता Google Meet चे फ्री व्हर्जन बंद करणार असून आजची शेवटची तारीख आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2020 नंतर Google Meet फक्त 60 मिनिटांसाठी विनामूल्य वापरले जाऊ शकते. यानंतर युजर्संना या सेवेसाठी पैसे द्यावे लागतील. म्हणजेच, केवळ पेड युजर्संना मोठ्या कालावधीच्या मीटिंग्ज घेता येणार आहेत आणि बाकीच्यांना पूर्वीसारखी अनलिमिटेड व्हिडिओ मीटिंग्ज करण्याचा ऑप्शन दिसणार नाही.
रिपोर्टनुसार, 30 सप्टेंबरनंतर Google Meetची नवीन पॉलिसी G Suite आणि G Suite Education या दोन्हींवर लागू होणर आहे. या वर्षाच्या सुरूवातीस गुगलने असे म्हटले आहे की, मीट अॅपवर व्हिडिओ कॉल करण्याची वेळ मर्यादा 60 मिनिटे असणार आहे. मात्र, कोरोना संकट काळात युजर्स Google Meet चा वापर वर्क फ्रॉम होम, मिटिंग आणि विद्यार्थी आपल्या ऑनलाइन शिक्षणासाठी करत होते. त्यामुळे हे लक्षात घेऊन कंपनीने 30 सप्टेंबरपर्यंत मीट अॅपवर व्हिडीओ कॉलिंग मोफत केले होते.
दरम्यान, जीसूट अंतर्गत 250 लोक एकाच वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतात, तर एक लाख लोक लाईव्ह पाहू शकतात. या व्यतिरिक्त मीटिंगचे रेकॉर्ड गुगल ड्राइव्हमध्ये देखील सेव्ह केले जाऊ शकते. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूम अॅपवर युजर्संना 45 मिनिटांचा व्हिडिओ कॉलिंग करताय येते. Google Meet आता सर्व युजर्संना 60 मिनिटांचा अॅक्सेस देणार आहे.