नवी दिल्ली : गुगलने (Google) एक नवीन फीचर जाहीर केले आहे, जे युजर्संना केवळ सर्चद्वारे निवडक देशांमध्ये ट्रेन तिकीट खरेदी करण्यास परवानगी देईल. सध्या, हे फक्त काही देशांमध्ये लाँच होणार आहे, परंतु कंपनीने या फीचरचा अधिक विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत ही सेवा इतर देशांमध्येही उपलब्ध होणार आहे.
गुगलने आता जर्मनी, स्पेन, इटली आणि जपानमधील युजर्संना आता निवडक देशांमध्ये आणि आसपासच्या प्रवासासाठी थेट गुगल सर्च (Google Search) वर रेल्वे तिकीट खरेदी करण्याचा एक सोपा ऑप्शन दिला आहे. आपल्या ट्रॅव्हल टूल्समध्ये सस्टेनबिलिटीचा समावेश करण्यात आल्याचे गुगलने म्हटले आहे.
"काही ट्रिपसाठी, ट्रेनद्वारे जाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो, परंतु A ते B पर्यंत जाण्यासाठी किमती आणि वेळापत्रकाच्या माहितीसाठी थोडे वेगळे सर्च करावे लागते", असे गुगलमधील ट्रॅव्हल प्रॉडक्ट्सचे व्हीपी रिचर्ड होल्डन म्हणाले. तसेच, त्यांनी मंगळवारी उशिरा एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की, "आजपासून, तुम्ही थेट Google Search वर ट्रेनची तिकिटे खरेदी करू शकता, विशेषत: जर्मनी, स्पेन, इटली आणि जपानसह काही निवडक देशांमधील प्रवासासाठी."
तुमच्यासाठी फक्त सर्च करा बेस्ट ट्रेनतुम्हाला फक्त सर्च करायचे आहे, जसे की 'बर्लिन ते व्हिएन्ना ट्रेन्स' आणि तुम्हाला सर्च रिझल्ट्समध्ये एक नवीन मॉड्यूल दिसेल, जे तुम्हाला तुमची प्रस्थान तारीख (Departure Date) निवडू आणि उपलब्ध ऑप्शनची तुलना करू देईल. एकदा तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेली ट्रेन निवडल्यानंतर, तुमचे बुकिंग पूर्ण करण्यासाठी भागीदाराच्या वेबसाइटवर थेट लिंक दिली जाते.
बसेससाठीही अशीच सेवा आणण्यात येणाररिचर्ड होल्डन म्हणाले, "आम्ही इतर रेल्वे सेवा प्रदान करण्याऱ्या संस्थांशी जोडले जाऊ, तसे ही सुविधा अधिक ठिकाणी पसरेल. आम्ही नजीकच्या भविष्यात बस तिकिटांसाठी अशाच फीचरची चाचणी सुरू करण्याची योजना आखत आहोत, जेणेकरून तुमच्याकडे इंटरसिटी प्रवासासाठी अधिक ऑप्शन उपलब्ध असतील." दरम्यान, फ्लाइट आणि हॉटेल या दोन्हीसाठी नवीन फिल्टरसह, गुगल सर्चवर अधिक कायमस्वरूपी ऑप्शन शोधणे सोपे आहे.