Google ने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज ‘Pixel 6’ च्या चिपसेटची माहिती दिली आहे. या सीरिजमधील Pixel 6 आणि Pixel 6 Pro मध्ये गुगलने स्वतः बनवलेला प्रोसेसर देण्यात येईल. Google चे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या कस्टम चिपसेट Google Tensor सह सादर केले जातील. या चिपसेटवर कंपनी गेले 4 वर्ष कंपनी काम करत असल्याची माहिती कंपनी सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली आहे.
Google Pixel 6 सीरीजची माहिती
Google ने आगामी Pixel 6 सिरीजच्या चिपसेटची माहित दिली आहे. या सीरिजमधील स्मार्टफोन Android 12 ओएसवर चालतील. तसेच यात कंपनीची Google Tensor SOC देण्यात येईल. या सिस्टम ऑन दि चिपमधील प्रोसेसर आणि जीपीयूची माहिती मात्र कंपनीने दिली नाही. परंतु यात पावरफुल AI आणि मशीन लर्निंग (ML) फीचर्स असतील, असे कंपनीने सांगितले आहे. यामुळे कॅमेरा, स्पीच रिकग्निशन आणि इतर अनेक फीचर्स मोठ्या प्रमाणात सुधारतील.
याआधी समोर आलेल्या रेंडर्समध्ये Pixel 6 स्मार्टफोनमधील कॅमेरा सेटअपची माहिती मिळाली होती. Pixel 6 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल तर प्रो व्हेरिएंटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपमध्ये कोणते कॅमेरा सेन्सर असतील याची अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. परंतु Pixel 6 Pro मध्ये 4x टेलीफोटो लेन्स दिला जाऊ शकते, हे गुगलने कन्फर्म केले आहे.