नवी दिल्लीः गुगल पेचा वापर करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलनं आपल्या डिजिटल वॉलेट प्लॅटफॉर्मला आणखी अद्ययावत केलं असून, आता चेहरा दाखवून पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. गुगल पेला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर जोडण्यात आलं असून, Google Pay अॅपवरून आता कोणतेही डिजिटल व्यवहार करताना ग्राहक बायोमॅट्रिक पद्धतीनं चेहरा दाखवून पैसे ट्रान्सफर करण्याच्या फीचरचा वापर करू शकतात.या नवीन फीचरला अँड्रॉइड 10बरोबर रोलआऊट करण्यात आलं आहे. तत्पूर्वी गुगल पेच्या माध्यमातून एखादा व्यवहार करताना युजर्सला पिन टाकावा लागत होता. परंतु नव्या अपडेटनंतर त्यात बदल झाला आहे. गुगलनं आता याला biometric APIचा सपोर्ट दिला आहे. त्यामुळे युजर्स पैसे दुसऱ्याला ट्रान्सफर करण्यासाठी अंगठ्याचा ठसा (fingerprint authentication) आणि चेहरा दाखवून पैसे ट्रान्सफर (face authentication) या सुविधांचा वापर करू शकतो. हे नवं फीचर पिनहून अधिक जलद गतीनं काम करणार आहे. अँड्रॉइड सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, ज्या फोनमध्ये अँड्रॉइड 10 व्हर्जन आहे, त्या फोनवर हे फीचर काम करणार आहे. पण हे फीचर्स लवकरच अँड्रॉइड 9मध्येही लाँच करण्यात येणार आहे. युजर्सला पर्यायात असलेलं Sending Moneyचं सेक्शन खाली सापडणार आहे. युजर्स PINमध्ये बायोमेट्रिक किंवा दोन्ही पर्यायांचा वापर करू शकतो. बायोमॅट्रिक सिक्युरिटी फीचर फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी देण्यात आलं आहे. या नवीन फीचरला 2.100 व्हर्जनसोबत रोल आऊट केलं आहे.
Google Payचं नवं फीचर; आता चेहरा दाखवून पैसे होणार ट्रान्सफर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 11:11 AM