Google Photos मधील फक्त पिक्सल स्मार्टफोनवर मिळणारी Locked Folder ची सुविधा आता सर्वच अँड्रॉइड स्मार्टफोनवर उपलब्ध होईल. हे फिचर जूनमध्ये सादर करण्यात आलं होतं. लाँचच्या वेळी कंपनीनं हे फिचर फक्त आपल्या स्मार्टफोन पुरतं मर्यादित ठेवलं होत. परंतु आता सर्व्ह अँड्रॉइड युजर्स गुगल फोटोजमध्ये सेव्ह केलेले फोटो आणि व्हिडीओ लॉक करू शकतील.
Google Photos Locked Folder फीचरच्या मदतीनं युजर्स फोनच्या गुगल फोटोज फोल्डरमध्ये सेव्ह केलेले फोटो आणि व्हिडीओ लॉक करू शकतील. त्यामुळे त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही ते फोल्डर ओपन करू शकणार नाही. सप्टेंबरमध्ये घोषणा केल्यानंतर आता हे खास फीचर सॅमसंग आणि वनप्लसच्या स्मार्टफोनमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे.
Google Photos Locked Folder फिचर
Google Photos Locked Folder हे फीचर Android 6.0 आणि त्यावरील अँड्रॉइड व्हर्जनमध्ये उपलब्ध होईल. या फिचरच्या मदतीने बनवलेल्या फोल्डरमधील फोटो आणि व्हिडीओ बॅकअप किंवा शेयर करता येणार नाहीत. तसेच या फोल्डर मधील फोटोजचा स्क्रिनशॉट देखील घेता येणार नाही. तसेच फोल्डर ओपन करण्यासाठी डिवाइस पासवर्ड विचारला जाईल. या फीचरच्या माध्यमातून युजर्स फोटो आणि व्हिडीओ सहज लपवू शकतील.
Locked Folder फिचर वापरण्यासाठी
- सर्वप्रथम Google Photos App मध्ये जा
- त्यानंतर Library मध्ये जा
- मग Utilities मध्ये जा
- तिथे Locked Folder चा पर्याय निवडा
- आता लॉक्ड फोल्डर सेट करून तुमचे फोटो आणि व्हिडीओ त्यात सेव्ह करा