गेल्या महिन्यात Google ने आगामी आपली Pixel 6 सीरिजची झलक दाखवली होती. त्यामुळे कंपनी आपला मिड रेंज स्मार्टफोन लाँच करणार नाही अश्या चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु तसे झाले नाही गुगलने काल नवीन पिक्सल स्मार्टफोन Google Pixel 5A टेक मंचावर सादर केला आहे. या स्मार्टफोनचे बरेचशे फीचर्स गतवर्षीच्या Pixel 4A सारखे आहेत फक्त या स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि बॅटरीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे.
Google Pixel 5A चे स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 5A स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.34-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा पंच-होल ओएलईडी डिस्प्ले 700निट्स ब्राइटनेस आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Pixel 4A प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये देखील आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. या पिक्सल फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच झालेला हा स्मार्टफोन लवकरच अँड्रॉइड 12 वर अपडेट होईल.
हे देखील वाचा: 108MP कॅमेरा असलेला स्वस्त मोटोरोला स्मार्टफोन भारतात लाँच; इथून विकत घेता येणार Motorola Edge 20 Fusion
गुगल पिक्सल 5ए स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा आहे. यात एलईडी फ्लॅशसह 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा ड्युअल मोड 5जी असलेला स्मार्टफोन IP67 रेटिंगसह सादर केला गेला आहे. सिक्योरिटीसाठी या पिक्सल फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पिक्सल 5ए स्मार्टफोनमधील 4,680mAh ची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे देखील वाचा: Redmi 10 सह अजून स्वस्त स्मार्टफोन येणार बाजारात; वेबसाईट लिस्टिंगमधून झाला खुलासा
Google Pixel 5A ची किंमत
गुगल पिक्सल 5ए स्मार्टफोनचा एकमेव 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 449 डॉलर्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ही किंमत 33,400 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन भारतात लाँच होणार कि नाही याची कोणतीही माहिती समोर आली नाही. काही दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार हा पिक्सल स्मार्टफोन अमेरिका व जापानमध्ये उपलब्ध होणार आहे.