Google Pixel 6 Series Launch Date: गुगलचे आज नवीन Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro स्मार्टफोन लाँच होणार आहेत. यांची खासियत म्हणजे हे फोन्स कंपनीच्या नव्या Tensor प्रोसेसरसह सादर केले जातील. कंपनी एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्मयातून हे दोन्ही फोन्स सादर केले जातील. Pixel 6 series चा लाँच इव्हेंट आज म्हणजे 19 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरु होईल. आणि Google च्या YouTube चॅनेलवरून याचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
Google Pixel 6 series ची लीक किंमत
याआधी ट्विटर युजर Evan Lei ने आगामी Pixel 6 series ची किंमत लीक केली होती. त्यानुसार Google Pixel 6 स्मार्टफोनचा 128GB व्हेरिएंट 599 डॉलर (सुमारे ₹ 45,900) मध्ये सादर केला जाऊ शकतो. तर Google Pixel 6 Pro चा 128GB व्हेरिएंट 898 डॉलर (सुमारे ₹ 67,500) मध्ये विकत घेता येईल. युनाटेड किंगडममध्ये ही किंमत क्रमशः 87,800 रुपये आणि 98,100 रुपये असू शकते अशी माहिती टिपस्टर रोलँड क्वॉन्डटने दिली आहे. या दोन्ही फोन्सच्या भारतीय लाँचची माहिती मात्र मिळेलेली नाही.
Google Pixel 6 and Google Pixel 6 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro मध्ये Tensor चिपसेट मिळेल. Pixel 6 Pro मध्ये 6.7 इंचाचा LTPO OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. तर Pixel 6 मध्ये 6.4 इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल. दोन्ही फोन्स कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्ट्सच्या सुरक्षेसह येतील. Pixel 6 Pro मध्ये 512GB पर्यंतची स्टोरेज दिला जाऊ शकते.
आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, दोन्ही फोन्स 50MP प्रायमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतील. त्याचबरोबर 12MP चा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देण्यात येईल. फक्त Pro व्हेरिएंटमध्ये अतिरिक्त टेलीफोटो लेन्स मिळेल. आगामी पिक्सल फोनमधील Magic Eraser फीचरची माहिती या फोन्सच्या लीक जाहिरातीमधून मिळाली होती. हे फिचर फोटोमधील अनावश्यक वस्तू हटवण्यास मदत करू शकतं.