शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शक्तिप्रदर्शनासाठी गुगल सज्ज; Pixel 6 आणि Pixel 6 Pro स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा 

By सिद्धेश जाधव | Published: October 06, 2021 3:03 PM

Google Pixel 6 series Launch Date: Google Pixel 6 सीरिज 19 ऑक्टोबरला जागतिक बाजारात लाँच करण्यात येईल. या सीरिजमध्ये कंपनी प्रथमच आपल्या प्रोसेसरचा वापर करणार आहे.

गुगलने आपल्या बहुप्रतीक्षित Pixel 6 सीरीजच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. गुगलचे आगामी फ्लॅगशिप पिक्सल डिवाइस 19 ऑक्टोबरला लाँच करण्यात येतील. या सीरिज अंतर्गत Pixel 6 आणि Pixel 6 Pro असे दोन फोन कंपनी सादर करणार आहे, याची माहिती कंपनीने याआधीच दिली होती. गुगलने या फोन्सच्या प्रोसेसरची माहिती देखील लाँचपूर्वी सांगितली आहे.  

Google Pixel 6 सीरिज 19 ऑक्टोबरला जागतिक बाजारात लाँच करण्यात येईल. या सीरिजमध्ये कंपनी प्रथमच आपल्या प्रोसेसरचा वापर करणार आहे. कंपनीने डेव्हलप केलेला टेन्सर प्रोसेसर आगामी पिक्सेल फोन्सना ताकद देईल.  

Google Pixel 6 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स 

Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात येईल. तर Pixel 6 Pro मधील 6.7-इंचाचा QHD+ अ‍ॅमोलेड कर्व डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. वर सांगितल्याप्रमाणे गुगलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये Tensor चिपसेट मिळेल.  

फोटोग्राफीसाठी पिक्सल 6 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेट असेल. तर प्रो व्हर्जन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. हे दोन्ही फोन्स गुगलच्या नव्याकोऱ्या Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतील. लीकनुसार, दोन्ही स्मार्टफोनमध्ये 50MP Samsung GN1 सेन्सर देण्यात येईल. त्याचबरोबर 12MP Sony IMX286 अल्ट्रावाईड कॅमेरा मिळू शकतो. प्रो मॉडेलमध्ये 4X झूम सपोर्ट असलेला 48MP Sony IMX586 टेलीफोटो कॅमेरा सेन्सर मिळू शकतो.  

कंपनी या फोनच्या किंमतीची अधिकृत माहिती दिली नाही. मीडिया रिपोर्टनुसार Pixel 6 स्मार्टफोनची किंमत 649 यूरो (सुमारे 56,000 रुपये) पासून सुरू होईल. Pro व्हेरिएंटची किंमत 899 यूरो (सुमारे 77,000 रुपये) पासून सुरु होऊ शकते.  

टॅग्स :googleगुगलAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान