टेक दिग्गज गुगलने याच आठवड्यात आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 6 आणि Pixel 6 Pro लाँच केले आहेत. ये दोन्ही स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी फक्त आठ देशांमध्ये उपलब्ध झाले आहेत आणि 28 ऑक्टोबरपासून या फोन्सची विक्री सुरु होईल. Pixel 6 series उपलब्ध झालेल्या आठ देशांमध्ये भारताचा समावेश करण्यात आला नाही. आणि आता कंपनीने Pixel 6 आणि Pixel 6 Pro स्मार्टफोन भारतात लाँच होणार नाहीत असे सांगितले आहे.
Pixel 6 Series India Launch
Google च्या प्रवक्त्यांनी एका निवेदनातून पिक्सल 6 सीरिजच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. यात जागतिक मागणी आणि पुरवठा व्यवस्थेत आलेल्या समस्यांचे कारण देत आमचे फोन सर्व बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ शकत नाहीत. आम्ही भविष्यात आमचे पिक्सल डिवाइसेस इतर देशांमध्ये उपलब्ध करवून देण्याचा विचार करू, असे सांगण्यात आले आहे. फ्लॅगशिप पिक्सल फोन भारतात न येण्याची ही काही पहिली वेळ नाही.
Google Pixel 6 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स
Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा फुल एचडी + अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर प्रो मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7-इंचाचा मोठा डिस्प्ले मिळतो. दोन्ही फोन्समध्ये कंपनीने बनवलेला Tensor चिपसेट देण्यात आला आहे. हे फोन्स Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.
फोटोग्राफीसाठी दोन्ही फोन्सयामध्ये 50-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर देण्यात आला आहे. फक्त प्रो मॉडेलमध्ये 48-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा सेन्सर अतिरिक्त देण्यात आला आहे, जो 4x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. Pixel 6 मध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे आणि 6 Pro मॉडेलमध्ये 11.1 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 4,614mAh ची बॅटरी आहे तर Pixel 6 Pro मध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते.