Google ऑगस्टमध्ये आपला Pixel 5A हा मिड रेंज स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी माहिती रिपोर्ट्समधून समोर आली आहे. त्यांनतर ऑक्टोबरमध्ये कंपनीचे Pixel 6 आणि Pixel 6 Pro हे स्मार्टफोन बाजारात दाखल होऊ शकतात. काही दिवसांपूर्वी एका लीक रिपोर्टमध्ये Pixel 6 सीरीजच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. आता Google Pixel 6 Pro स्मार्टफोनचा एक फोटो लीक झाला आहे. या लीक फोटोच्या माध्यमातून फोनच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. (Google pixel 6 Pro Live Photos Suggest Huge Rear Camera Sensors And Slim Bezels)
Google Pixel 6 Pro ची डिजाईन
लीक फोटो नुसार, Google Pixel 6 Pro स्मार्टफोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्लेमध्ये एका पंच होलसह खूप बारीक पातळ बेजल मिळतील. समोर आलेल्या फोटोमध्ये कोणताही फिजिकल फिंगरप्रिंट दिसत नाही, त्यामुळे या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट असण्याची शक्यता आहे. Pixel 6 Pro च्या मागे ड्युअल टोन फिनिश आणि हॉरीझॉन्टल कॅमेरा स्ट्रीप देण्यात आली आहे.
या स्ट्रीपमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि एक LED फ्लॅश मिळू शकतो. कॅमेरा सेटअपमध्ये एक आयताकृती कॅमेरा दिसत आहे, हा कॅमेरा Periscope Zoom लेन्स असू शकते. फोनच्या खालच्या भागात GR1YH हा मॉडेल नंबर दिसला आहे. याआधी आलेल्या रिपोर्ट्समध्ये या मॉडेल नंबरचा उल्लेख करण्यात आला आहे. फोनच्या मध्यभागी गुगलची ब्रँडिंग दिसत आहे.
Google Pixel 6 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Pixel 6 Pro स्मार्टफोनमध्ये 6.71-इंचाचा पी-ओएलईडी डिस्प्ले मिळू शकतो. हा स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्या पंच होल कटआउटमध्ये देण्यात येईल. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. त्याचबरोबर 48 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि 12 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स देखील मिळेल. रिपोर्ट्सनुसार, फोनमध्ये गुगलने बनवलेला चिपसेट असेल. या चिपसेटला 12GB पर्यंतच्या रॅमची जोड देण्यात येईल. हा गुगल स्मार्टफोन अँड्रॉइड 12 सह बाजारात दाखल होऊ शकतो. यात 5000mAh ची बॅटरी फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते.