गुगलने गेल्याच महिन्यात आपली नवीन ‘पिक्सल 6’ सीरिज जगासमोर ठेवली होती. पहिल्यांदाच कंपनीने आपल्या टेन्सर चिपसेटसह Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro लाँच केले केले होते. लाँचनंतर फक्त एका महिन्याच्या आत स्मार्टफोन्समध्ये विविध समस्या समोर येऊ लागल्या आहेत. काही फोन फिंगरप्रिंट रजिस्ट्रेशनविना देखील अनलॉक होत आहेत तर अनेक युजर्सच्या फोनवर नंबर डायल न करताच कॉल लागत आहे.
आपोआप केला जातोय कॉल
युजर्सच्या तक्रारीनुसार गुगल पिक्सल 6 स्मार्टफोनवर नंबर डायल न करताच आपोआपच कॉल लागत आहे. विशेष म्हणजे फोन हातात नसताना किंवा बाजूला ठेवला असताना कॉल लागत आहे. फोनला स्पर्श न करता आणि कोणत्याही व्हॉइस कमांडविना कॉल जात असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. अशी तक्रार गुगल पिक्सल 6 स्मार्टफोनच्या अनेक युजर्सनी केली आहे.
कोणाच्याही फिंगरप्रिंटने फोन होतोय अनलॉक
पिक्सल 6 स्मार्टफोन युजर्सच्या सिक्योरिटीशी देखील खेळत आहे. एका युजरने तक्रार केली आहे कि, त्याचा पिक्सल 6 स्मार्टफोन इतर कोणीही टच केल्यावर देखील अनलॉक होत आहे. विशेष म्हणजे अन-रजिस्टर्ड फिंगरप्रिंटने देखील फोन अनलॉक होत आहे. या समस्येचा एक व्हिडीओ देखील युजरने पोस्ट केला आहे.
या दोन्ही समस्या एखाद्या बगमुळे उद्भवल्याचे दिसत आहे. त्यामुळे कंपनी सॉफ्टवेयर अपडेटद्वारे या समस्या सोडवू शकते. परंतु तोपर्यंत फ्लॅगशिप Google Pixel 6 मधील या बगमुळे कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.