गुगलने आगामी Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. हे फोन्स 19 ऑक्टोबरला आयोजित इव्हेंटमधून ग्राहकांच्या भेटीला येतील. तत्पूर्वी आता या फोनच्या किंमतीची माहिती लीक झाली आहे. तसेच या मोबाईल्सच्या प्री ऑर्डरवर एक गिफ्ट देखील कंपनी देणार आहे त्याचा देखील खुलासा झाला आहे.
Google Pixel 6 series ची किंमत
Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro ची किंमत जर्मनीच्या वेबसाईट लिस्टिंगमधून समोर आली आहे. या लिस्टिंगनुसार Google Pixel 6 चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 649 यूरो (सुमारे 56,000 रुपये) असेल. तसेच या स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डरवर Bose 700 Headphones मोफत मिळतील, ज्यांची किंमत 279.99 यूरो (सुमारे 24,000 रुपये) आहे. इसके गुगलची ही ऑफर 27 ऑक्टोबरपर्यंत वैध राहणार आहे. या सीरिजमधील मोठा Google Pixel 6 Pro स्मार्टफोन 899 यूरो (सुमारे 77,800रुपये) असू शकते.
Google Pixel 6 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स
Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात येईल. तर Pixel 6 Pro मधील 6.7-इंचाचा QHD+ अॅमोलेड कर्व डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. वर सांगितल्याप्रमाणे गुगलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये Tensor चिपसेट मिळेल.
फोटोग्राफीसाठी पिक्सल 6 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेट असेल. तर प्रो व्हर्जन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. हे दोन्ही फोन्स गुगलच्या नव्याकोऱ्या Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतील. लीकनुसार, दोन्ही स्मार्टफोनमध्ये 50MP Samsung GN1 सेन्सर देण्यात येईल. त्याचबरोबर 12MP Sony IMX286 अल्ट्रावाईड कॅमेरा मिळू शकतो. प्रो मॉडेलमध्ये 4X झूम सपोर्ट असलेला 48MP Sony IMX586 टेलीफोटो कॅमेरा सेन्सर मिळू शकतो.