शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

Google Pixel 7 & 7 Pro: गुगलचा पिक्सल 7 अन् 7 Pro भारतात लाँच; 10 हजारांनी स्वस्त... जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 9:14 PM

गुगलने Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro लाँच केले आहेत. या फोन्समध्ये Titan M2 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ५ वर्षांच्या सिक्युरिटी अपडेटचा वादाही करण्यात आला आहे.

गुगलने दोन नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरविले आहेत. गुगलने पिक्सल सिरीज Made by Google या कार्यक्रमात लाँच केली. आता हे दोन्ही फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले असून Google Pixel Watch देखील गुगल लाँच करत आहे. 

सध्यातरी हे फोन GoogleStore.com, फ्लिकार्टवरून खरेदी करता येणार आहेत. गुगलने Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro लाँच केले आहेत. या फोन्समध्ये Titan M2 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ५ वर्षांच्या सिक्युरिटी अपडेटचा वादाही करण्यात आला आहे. Pixel 7 सिरीजमध्ये व्हीपीएन सेवा ही या वर्षीच्या अखेरीपर्यंत उपलब्ध होईल. पिक्सल ७ ची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. बँक ऑफरमध्ये हा फोन 49,999 रुपयांना मिळणार आहे. तर Pixel 7 Pro ची किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यावर देखील बँक डिस्काऊंच देण्यात येत आहे. या दोन्ही फोनची डिलिव्हरी पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. 

Google Pixel 7 मध्ये काय काय? पिक्सल ७ मध्ये 6.32-इंचाची full-HD+ pOLED स्क्रीन देण्यात आली आहे. रिफ्रेश रेट 90Hz आहे.  गोरिल्ला ग्लास 7 चे संरक्षण दिले आहे. Tensor G2 चिपसेट देण्यात आला असून 8GB रॅम आणि 256GB पर्यंत मेमरी देण्यात आली आहे. पिक्सलचे फोन हे फोटोग्राफीसाठी ओळखले जातात. मागे ड्युअल कॅमेरा देण्यात आला असून प्रायमरी सेन्सर हा ५० मेगापिक्सल आणि दुसरा १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड असणार आहे. सेल्फीसाठी सुद्धा पुढे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. १० आणि ८ मेगापिक्सलचे हे कॅमेरे असणार आहेत. तसेच 4,355mAh ची वायरलेस चार्जिंग सपोर्टची बॅटरी देण्यात आली आहे. 

Pixel 7 Pro मध्ये काय काय?6.7-इंचची pOLED स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटची देण्यात आली आहे. 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज स्पेस देण्यात आले आहे. पाठीमागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असून प्रायमरी सेन्सर हा ५० मेगापिक्सल आणि दुसरा १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आहे, तर तिसरा 48-मेगापिक्सल टेलिफोटो देण्यात आला आहे. पुढे पिक्सल ७ प्रमाणेच सेल्फी कॅमेरे आहेत. 5,000mAh ची वायरलेस चार्जिंग सपोर्टची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनला IP68 रेटिंग आहे. 

टॅग्स :googleगुगल