Google आपले स्मार्टफोन्स पिक्सल सीरिज अंतर्गत सादर करतं. या फोन्सच्या कॅमेरा क्वॉलिटीचं कौतुक बऱ्याचदा ऑनलाईन केलं जातं. आता गुगल आपल्या नव्या Pixel 7 सीरीज स्मार्टफोनवर काम करत आहे. ताज्या लीक रिपोर्ट्समधून Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांची माहिती आली आहे. टिप्सटर योगेश ब्रारनं दिलेल्या माहितीनुसार पिक्सल 7 सीरीजमध्ये गुगल पिक्सल 6 सीरीजस सारखाच कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
लीकनुसार, वॅनिला Pixel 7 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 50-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 12-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स मिळेल. तर Pixel 7 Pro स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. यातील वॅनिला व्हर्जनप्रमाणे दोन सेन्सर असतील आणि सोबत 48 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा दिला जाईल.
Google Pixel 7 सीरीजचे लीक स्पेसिफिकेशन्स
Pixel 7 स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा तर Pixel 7 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. Pixel 7 स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट मिळू शकतोतर स्क्रीन दिला जाऊ शकतो. प्रो मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला LTPO पॅनल दिला जाऊ शकतो. गुगलचे हे स्मार्टफोन Google Tensor प्रोसेसरसह सादर केले जाऊ शकतात. ऑनलाईन लीक झालेल्या Google Pixel 7 सीरीजच्या रेंडरनुसार, कंपनी डिजाईनमध्ये देखील जास्त बदल करणार नाही हे दिसत आहे.