Google नं गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये आपली Pixel 6 सीरीज सादर केली होती. ही कंपनीच्या स्वतःच्या चिपसेटसह येणारी पहिली सीरिज होती. ज्यात Pixel 6 आणि Pixel 6 Pro स्मार्टफोनचा समावेश होता. आता या सीरिजच्या अपग्रेड व्हर्जनच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. लवकरच Google Pixel 7 सीरीजमध्ये Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतो. .
Google Pixel 7 सीरीजची डिजाईन
Lets Go Digital च्या रिपोर्टमध्ये एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ Google Pixel 7 Pro स्मार्टफोनच्या रेंडर्सचा असल्याचा दावा वेबसाईटनं केला आहे. या रेंडर्सनुसार फोनच्या बॅक पॅनलवर टेलीफोटो लेन्ससह दोन कॅमेरा सेन्सर असलेला सेटअप आहे. हा कॅमेरा सेटअप जुन्या Pixel 6 Pro सारखा दिसत असला तरी यात काही बदल केले जाऊ शकतात.या फोनच्या सर्व कडा पातळ आहेत. तर मागे ड्युअल-टोन डिजाइन दिली जाऊ शकते.
Google Pixel 7 Pro चे लीक स्पेसिफिकेशन
आगामी पिक्सल फोन Android 13 सह येऊ शकतो. यात 6.7 इंचाचा QHD+ ओएलईडी डिस्प्ले दिला जाईल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. यात पंच होल डिजाईन दिली जाऊ शकते. तसेच यात कंपनीचा स्वतःचा Tensor प्रोसेसर मिळेल. गुगलनं मात्र आगामी Pixel 7 सिरीजबाबत अजूनतरी मौन बाळगलं आहे.
हे देखील वाचा: